कतारमध्ये होणाऱ्या 22व्या फिफा विश्वचषकासाठी आतापर्यंत सर्वच सहभागी देशांनी आपापले संघ जाहीर केले आहेत. या विश्वचषकातील पहिला सामना 20 नोव्हेंबरला कतार विरुद्ध इक्वॉडोर यांच्यात खेळला जाणार आहे. या विश्वचषकासाठी आयोजकांंची वेळ आणि ठिकाण चुकले असल्याच्या विधाने अनेक दिग्गज फुटबॉलपटूंनी केली, मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आला. असो तर या स्पर्धेसाठी संघ जाहीर करताना सोशल मीडियावर जे प्रकार वापरले गेले त्यामध्ये उरुग्वे ट्रेंड होत आहे.
उरुग्वेचा लुईस सुआरेझ (Luis Suarez), एडिनसन कवानी यांची संघात निवड झाली असून त्यांचा हा चौथ्या विश्वचषक आहे. त्याचबरोबर दुखापतग्रस्त रोनाल्ड अरौजो, रिअल माद्रिदचा मिडफिल्डर फेडेरिको व्हॅल्व्हर्डे आणि लिवरपूलचा स्ट्रायकर डार्विन न्युनेझ ही आणखी दोन स्टार नावे संघात आहेत.
खेळाडूंची नावे जाहीर करताना उरुग्वेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ रिलीज केला. ज्यामध्ये उरुग्वेचे मुख्य प्रशिक्षक अलोंसो दिएगो हे सुरूवातीला उरुग्वेचा नकाशा उघडताना दिसतात. त्यामध्ये पुढे स्थानिक लोकांच्या मदतीने जर्सीच्या साहाय्याने खेळाडूंची नावे घोषित केली गेली.
सुआरेझ आणि कवानी हे दोघेही उरुग्वेच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारे खेळाडू आहेत.त्यांनी अनुक्रमे 68 आणि 58 गोल केले आहेत. तसेच त्यांनी 130 पेक्षा अधिक सामने खेळले आहेत. आणखी तीन दिग्गज संघात सामील करण्यात आले आहेत. त्यामध्ये डिएगो गोडिन, मार्टिन कॅसेरेस आणि गोलकीपर फर्नांडो मुस्लेरा यांचा समावेश आहे. हे पाचही जण 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या संघात होते. त्या स्पर्धेत उरुग्वेने उपांत्य फेरी गाठली होती. त्याही सामन्यात हे सर्व खेळले होते.
उरुग्वे हे 1930 आणि 1950च्या विश्वचषकाचे विजेते ठरले होते. या स्पर्धेत ते ग्रुप एचमध्ये आहे. यामध्ये त्यांच्यासोबत पोर्तुगल, घाना आणि दक्षिण कोरिया यांचा समावेश आहे.
कतारमध्ये उरुग्वेचा पहिला सामना पोर्तुगलशी होणार आहे.
🇺🇾 𝗟𝗢𝗦 𝟮𝟲
Recorrimos el @Uruguay_Natural en busca de los elegidos de @AlonsoDT para el Mundial de Catar.
¡Vamos por el sueño!#ElEquipoQueNosUne pic.twitter.com/IkROEEfrQY
— Selección Uruguaya (@Uruguay) November 10, 2022
उरुग्वेचा संघ-
गोलकीपर: सर्जिओ रोशेट, फर्नांडो मुस्लेरा, सेबॅस्टियन सोसा
डिफेंडर: जोस लुईस रॉड्रिग्ज, गिलेर्मो वॅरेला, रोनाल्ड अरौजो, जोस मारिया गिमेनेझ, सेबॅस्टियन कोट्स, दिएगो गोडिन, मार्टिन कॅसेरेस , मॅटियास विना, मॅथियास ऑलिवेरा
मिडफिल्डर: मॅटियास वेसिनो, रॉड्रिगो बेंटॅन्कूर, फेडेरिको व्हॅल्व्हर्डे, लुकास टोरेरा, मॅन्युएल उगार्टे, फॅकुंडो पेलिस्ट्री, निकोलस डे ला क्रूझ, जॉर्जियन डी अरासकाएटा, अगस्टिन कॅनोबियो, फॅकुंडो टोरेस
फॉरवर्ड: डार्विन नुनेझ, लुईस सुआरेझ, एडिन्सन कावानी, मॅक्सिमिलियानो गोमेझ
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘काही लोकांचा चेहरा पुढच्या विश्वचषकात पाहायचा नाहीये’, विरेंद्र सेहवागची तिखट प्रतिक्रिया
लाईव्ह शोमध्ये का रडला शोएब मलिक? पत्नी सानिया मिर्झाशी घटस्फोटाच्या चर्चांना उधाण