सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने मंगळवारी (25 एप्रिल) आपला चौथा आयपीएल सामना गुजरात टायटन्सविरुद्ध खेळला. या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ब्रेट ली याने अर्जुन तेंडुलकरविषयी खास प्रतिक्रिया दिली. ब्रेट लीच्या मते अर्जुन तेंडुलकर वेगाचा बादशाह बनू शकतो. आता कारकिर्दीतील सुरुवातीच्या दिवसांमध्येच 140 किमी ताशी गतीने गोलंदाजी करत आहे.
अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याने आयपीएल 2023च्या आपल्या चार सामन्यांमध्ये तीन विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्ससाठी अर्जुन तेंडुलकरने सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने काही षटके उत्कृष्ट टाकली, पण काही षटकांमध्ये अर्जुन संघासाठी महागात देखील पडला. नवख्या अर्जुन तेंडुलकरवर मोठ्या प्रमाणात टीका देखील झाली. मात्र, अशातच ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली (Brett Lee) याने अर्जुनला धीर दिला आहे.
एका वृत्तमाध्यमाशी बोलताना ब्रेट ली म्हणाला, “मला वाटते तो कोणत्याही फेजमध्ये गोलंदाजी करू शकतो. मी अर्जुनलकरवर खूप जास्त प्रभावित आहे. मला वाटते तो मुंबई इंडियन्ससाठी चांगल्या फॉर्ममध्ये आहे. नवीन चेंडूसह त्याची गोलंदाजी चांगली राहिली आहे. तो चेंडूला स्विंग करत आहे. तो मध्यल्या षटकांमध्येही अनुकूल आहे आणि अनुभव घेत आहे. तो शेवटच्या षटकांमध्येही गोलंदाजीचा आनंद घेत आहे. त्याची गोलंदाजी कौतुकास पात्र आहे.”
अर्जुनच्या चेंडूला चांगली गती आहे. मात्र, सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात त्याने 107.2 किमी ताशी गतीने चेंडू टकला होता. याच कारणास्तव त्याच्यावर टीका देखील झाला. याविषयी ब्रेट ली म्हणाला, “लोक जवळपास सर्वच गोष्टींवर टीका करत असतात. तुम्ही संदीप शर्माला पाहिले, तर तो 120 किमी ताशी गतीने गोलंदाजी करतो. अर्जुन किमान त्याच्यापेक्षा जास्त गतीनेच गोलंदाजी करत आहे. तो फक्त 23 वर्षांचा आहे आणि त्याच्यासमोर संपूर्ण कारकीर्द आहे.”
“त्याने टीकाकारांकडे दुर्लक्ष करावे, हा त्याला माझ्याकडून सल्ला असेल. आपल्या वडिलांच्या कारकिर्दीतून त्याने धडा घेतला पाहिजे. तो 140 किमी ताशी गतीने गोलंदाजी करू शकतो. मोठ्या लाईट्स आणि प्रेक्षकांच्या गर्दीसमोर त्याला आत्मविश्वास आल्यानंतर त्याची गती अजून वाढेल. त्याच्या गतीविषयी मला काहीच अडचण नाहीये. तो किती वेगात गोलंदाजी करू शकतो, हे मला ठावूक आहे. सोशल मीडियावर टीका करणाऱ्या बहुतांश लोकांना आयुष्यात एकही चेंडू टाकला नाहीये. ते फक्त कीबोर्डवर लढाई करणारे आहेत.”
दरम्यान, मंगळवारी गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्याचा विचार केला, तर अर्जुनने टाकलेल्या दोन षटकात 9 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट घेतली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने 20 षटकात 6 बाद 207 धावा केल्या. (‘Learn from your father’s career…’, Arjun Tendulkar gets ‘this’ valuable advice from former legend Brett Lee )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारला का खेळवले होते? WTC फायनलसाठी संधी न मिळाल्याने होतेय चर्चा
GTvsMI । नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम गोलंदाजी, पण महत्वाचा खेळाडू सामन्यात बाहेर