भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनीने मागीलवर्षी जानेवारीमध्ये मर्यादीत षटकांच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. यानंतर विराट कोहलीकडे भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा सोपवण्यात आली.
हे कर्णधारपद सोडण्याबद्दल धोनीने रांचीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात माहिती दिली आहे. याबद्दल तो म्हणाला, “मी कर्णधारपद सोडले कारण मला नवीन कर्णधाराला 2019 च्या विश्वचषकाच्या तयारीसाठी पुरेसा वेळ द्यायचा होता.”
“भक्कम संघाची निवड ही नवीन कर्णधाराला योग्य वेळ दिल्याशिवाय करणे शक्य नव्हते. मला विश्वास आहे मी योग्य वेळी कर्णधारपद सोडले.”
भारतीय संघाने नुकतेच इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेत 4-1 अशा फरकाने पराभव पत्कारला आहे. या पराभवाबद्दलही दोन वर्षापूर्वी डिसेंबर 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेल्या धोनीने आपली मते मांडली.
धोनी म्हणाला, ‘या मालिकेआधी भारतीय संघाला कमी सराव सामने कमी खेळल्याचा फटका बसला. त्यामुळे फलंदाजांना खेळताना अवघड गेले. पण हा खेळाचा एक भाग आहे. आपल्याला हे विसरुन चालणार नाही की भारत अजूनही अव्वल क्रमांकावर आहे.’
कर्णधार म्हणून 3 आयसीसी चषक जिंकलेला धोनी आता 15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या 14 व्या एशिया कपमध्ये खेळणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे काही खेळाडू दुबईला रवाना झाले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप १०: एशिया कप स्पर्धेबद्दल या गोष्टी माहित आहेत का?
–हा पाकिस्तानी गोलंदाज म्हणतोय विराटविना देखील भारत तितक्याच ताकदीचा
–संपुर्ण यादी- असे आहेत एशिया कप २०१८ स्पर्धेतील सर्व संघांचे खेळाडू