भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना इंग्लंडच्या के ओव्हल येथे खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी आजी-माजी दिग्गज आपापली प्लेइंग इलेव्हन निवडत आहेत. अशात यामध्ये भारतीय दिग्गज खेळाडू सुनील गावसकर यांचाही समावेश झाला आहे. गावसकरांनी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी आपली भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
भारतीय संघाची डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात (WTC Final) पोहोचण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी 2021च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात भारतीय संघाला केन विलियम्सन याच्या नेतृत्वातील न्यूझीलंड संघाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. आता 7 ते 11 जूनदरम्यान पार पडणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023च्या (World Test Championship 2023 Final) अंतिम सामन्यापूर्वी दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारतीय प्लेइंग इलेव्हन निवडली आहे.
गावसकरांची प्लेइंग इलेव्हन
स्टार स्पोर्ट्सशी बोलताना गावसकरांनी आशा व्यक्त केली की, भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाज आणि 2 फिरकीपटूसोबत उतरेल. ते म्हणाले की, यष्टीरक्षक म्हणून संंघ व्यवस्थापनाने केएस भरत याला ईशान किशनच्या आधी प्राथमिकता दिली पाहिजे.
गावसकर म्हणाले, “फलंदाजांबद्दल सांगायचं झालं, तर रोहित शर्मा आणि शुबमन गिल डावाची सुरुवात करतील. तिसऱ्या क्रमांकावर चेतेश्वर पुजारा, चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आणि पाचव्या क्रमांकावर अजिंक्य रहाणे असतील.” गावसकर म्हणाले की, सहाव्या क्रमांकासाठी भारतीय संघासाठी एक आव्हान असू शकते. कारण, त्यांना इथे केएस भरत (KS Bharat) आणि ईशान किशन (Ishan Kishan) यांच्यापैकी एकाला निवडावे लागेल.
आपला निर्णय सांगताना ते म्हणाले की, “मला वाटते की, सहाव्या क्रमांकावर केएस भरत किंवा ईशान किशन यांच्यापैकी एक असेल. ते भरतबाबत बोलत आहेत. कारण, त्याने अशाप्रकारचे सामने यापूर्वीही खेळले आहेत. त्यामुळे कदाचित ते या क्रमांकावर भरतला निवडतील.”
पुढे बोलताना गावसकर म्हणाले की, भारताने तीन वेगवान आणि दोन फिरकीपटूंसोबत उतरले पाहिजे. गावसकरांनी बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये शानदार प्रदर्शन करणाऱ्या अक्षर पटेल याला आपल्या संघात घेतले नाही. ते म्हणाले की, “सातव्या क्रमांकावर रवींद्र जडेजा खेळेल. जर ऊन असेल आणि वातावरण चांगले असेल, तर मला वाटते की, जडेजा सातव्या आणि आर अश्विन आठव्या क्रमांकावर खेळले. 9, 10, 11वर अनुक्रमे मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि कदाचित शार्दुल ठाकूर खेळेल.” (legend cricketer sunil gavaskar picked india playing xi in wtc final against australia)
सुनील गावसकरांची संभावित प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मला त्याच्या बॅटिंगवर जास्त विश्वासच नाही’, WTC अंतिम सामन्यापूर्वी हरभजनचे खळबळजनक भाष्य
देव माणुस! वीरेंद्र सेहवागची मोठी घोषणा, ओडिशा अपघातग्रस्तांच्या मुलांचे भविष्य केले सुरक्षित