---Advertisement---

लकी फॅन! धोनीच्या बाईकवर बसून धन्य झाला चाहता, सतत पाहिला जातोय व्हिडिओ

On: शुक्रवार, सप्टेंबर 15, 2023 4:00 PM
MS-Dhoni
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा महान कर्णधार म्हणून एमएस धोनी याला ओळखले जाते. धोनीने भारताला आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. धोनी 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. मात्र, अजूनही त्याच्या लोकप्रियतेमध्ये कमी झाली नाहीये. धोनीचे नेहमीच फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यामुळे चाहते खूपच खुश होतात. अशात आता धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये धोनीने आपल्या एका चाहत्याला खुश केल्याचे दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत महेंद्र सिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) आपल्या बाईकवर एका चाहत्याला लिफ्ट देताना दिसत आहे. हा व्हिडिओ खूपच रंजक आहे. व्हिडिओत दिसते की, धोनी मैदानावर सराव संपवून निघण्याची तयारी करत असतो. यानंतर व्हिडिओत दिसते की, चाहता गाडीवर धोनीच्या मागे बसलेला असतो. यावेळी बाईक चालवताना धोनीने हेल्मेट परिधान केल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्याचा चेहरा दिसत नाहीये.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1702551159389774300

https://twitter.com/JharkhandJatraa/status/1702547147303076120?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1702547147303076120%7Ctwgr%5Ed3380bfe422bc7e234b1571553a5440f09279c77%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fms-dhoni-gave-lift-to-his-fan-and-young-cricketer-on-his-bike-watch-viral-video-here-2494865

व्हिडिओनुसार, धोनीने एका युवा क्रिकेटपटूला आपल्या यमाहा RD350 बाईकवर लिफ्ट दिली. अशाप्रकारे धोनीने चाहत्याला लिफ्ट देऊन त्याचा दिवस खास केला आहे. धोनी नेहमीच त्याच्या रांची शहरात बाईकवर फेरफटका मारताना दिसतो. धोनीचे बाईकबद्दलचे प्रेम कुणापासूनही लपलेले नाहीये. त्याची बाईक्सबद्दलची आवड यावरून दिसते की, धोनीने त्याच्या रांचीतील फार्म हाऊसवर बाईकचे भलेमोठे गॅरेज बनवले आहे. यामध्ये वेगवेगळ्या आलिशान, विंटेज आणि महागड्या बाईक्स आहेत. अलीकडेच, या गॅरेजचे फोटो आणि व्हिडिओही समोर आले होते.

आयपीएल 2024मध्ये दिसणार धोनी
धोनीने आयपीएल 2023 स्पर्धेत आपल्या चेन्नई सुपर किंग्स संघाला ट्रॉफी जिंकून दिली होती. यानंतर त्याने स्पष्ट केले होते की, तो जर फिट असला, तर तो आयपीएल 2024 हंगामात खेळताना दिसेल. मात्र, चाहत्यांना आशा आहे की, तो 2024मध्ये खेळताना दिसेल. (legend ms dhoni gave lift to his fan and young cricketer on his bike see video)

हेही वाचा-
Asia Cup 2023: सुपर-4 च्या अखेरच्या सामन्यात ‘हिटमॅन’ने जिंकला टॉस, तिलक वर्मासह ‘या’ खेळाडूचे वनडे पदार्पण
भारताची विश्वचषकातील ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही म्हणाल, ‘यंदा World Cup Trophy आपलीच’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---