मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर शुक्रवारी (दि. 17 मार्च) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात पहिला वनडे सामना रंगला होता. या सामन्यात अष्टपैलू रवींद्र जडेजा याने वाहवा लुटली. जडेजाला पाहून असे वाटतच नव्हते की, तो 8 महिन्यानंतर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. त्याने यावेळी फक्त गोलंदाजी आणि फलंदाजीतूनच नाही, तर क्षेत्ररक्षणातूनही कमाल दाखवली. जडेजाने सामन्यादरम्यान एक अफलातून झेल पकडला. अशात आता त्याच्या फोटो आणि व्हिडिओसोबतच भारताचा माजी दिग्गज कर्णधार एमएस धोनी याचे एक जुने ट्वीटही व्हायरल होत आहे.
रवींद्र जडेजाचा जबरदस्त झेल
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 23वे षटक भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादव (Kuldeep Yadav) टाकत होता. यावेळी स्ट्राईकवर मार्नस लॅब्युशेन (Marnus Labuschagne) होता. यावेळी कुलदीपच्या षटकातील ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चौथा चेंडू लॅब्युशेनने पॉईंटच्या दिशेने खेळला. फलंदाजाला वाटले की, चेंडू थेट सीमारेषेच्या दिशेने चौकारासाठी जाईल. मात्र, जडेजा सीमारेषा आणि चेंडूच्या मध्ये आला. त्याने पॉईंटवर उजव्या बाजूला झेप घेत शानदार झेल पकडला. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1455951546185773061
रवींद्र जडेजाचा झेल पाहण्यासाठी येथे क्लिक करा-
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1636667198482661377
https://twitter.com/Swaroop_RJ08/status/1636754102729461760
एमएस धोनीचे ट्वीट
रवींद्र जडेजाने झेल (Ravindra Jadeja Catch) पकडताच एमएस धोनी याचे जुने ट्वीट (MS Dhoni Old Tweet) व्हायरल होत आहे. हे ट्वीट जवळपास 10 वर्षांपूर्वीचं आहे. त्यावेळी धोनी भारतीय संघाचा कर्णधार होता. त्याने त्याच्या ट्वीटमध्ये लिहिले होते की, “सर जडेजा झेल घेण्यासाठी धावत नाही, चेंडू त्याला स्वत:च शोधतो आणि त्याच्या हातावर जाऊन लागतो.” या सामन्यात जडेजाने ज्याप्रकारे झेल घेतले, त्यानंतर धोनीचे हे ट्वीट व्हायरल होत आहे.
https://twitter.com/msdhoni/status/321544297390436352?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E321544297390436352%7Ctwgr%5E5fd0f97205f65801ee3d09a2787450353a3cc95a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketaddictor.com%2Fcricket-news%2Fms-dhoni-old-tweet-going-viral-after-ravindra-jadeja-amazing-catch-in-1st-odi-ind-vs-aus%2F
जडेजाने घेतल्या दोन महत्त्वाच्या विकेट्स
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर जडेजाने फक्त क्षेत्ररक्षणातच नाही, तर गोलंदाजी आणि फलंदाजीतही कमाल केली. त्याने आधी गोलंदाजी करताना 81 धावांची वादळी खेळी करणाऱ्या मिचेल मार्श याला बाद करण्यासोबतच ग्लेन मॅक्सवेल यालाही 8 धावांवर तंबूत धाडले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारताच्या डावात फलंदाजी करताना जडेजाने केएल राहुल याच्यासोबत नाबाद 108 धावांची भागीदारी रचली. यामध्ये जडेजाच्या नाबाद 45 धावांचा समावेश होता. जडेजाने या खेळीत 5 चौकारही मारले होते. (legend ms dhoni old tweet going viral after all rounder ravindra jadeja amazing catch in 1st odi ind vs aus)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बोला था ना बंदे में है दम…’, म्हणत राहुलच्या झुंजार खेळीवर हरभजन फिदा, तर सेहवाग म्हणाला…
‘सामनावीर’ पुरस्कार पटकावताच जडेजाचे मन जिंकणारे विधान; म्हणाला, ‘मी 8 महिन्यानंतर…’