---Advertisement---

धोनीकडून ऑटोग्राफ घेण्यासाठी गावसकरांनी भेदला सुरक्षा घेरा, पळत जाऊन मारली मिठी, पाहा संपूर्ण व्हिडिओ

Sunil-Gavaskar-And-MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेतील 61व्या सामन्यात रविवारी (दि. 14 मे) चेन्नई सुपर किंग्स वि. कोलकाता नाईट रायडर्स संघ आमने-सामने होते. या सामन्यात चेन्नई संघाला 6 विकेट्सने पराभवाचा धक्का सहन करावा लागला. घरच्या मैदानावर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडिअमवर पार पडलेल्या या सामन्यानंतर कर्णधार महेंद्र सिंग धोनी याने चाहत्यांना अनोख्या अंदाजात धन्यवाद दिला. तसेच, स्टेडिअमची चक्कर मारत चाहत्यांच्या दिशेने चेंडू आणि भेटवस्तू फेकल्या. यादरम्यान एमएस धोनीने सुनील गावसकर यांना ऑटोग्राफ दिला.

अशात सुनील गावसकरांनी एमएस धोनीकडून ऑटोग्राफ घेतला, त्यामुळे चर्चा रंगली आहे की, धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो. अशातच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात गावसकर धोनीचा ऑटोग्राफ घेण्यासाठी धावताना दिसत आहेत.

खरं तर, चेन्नई विरुद्ध कोलकाता संघातील सामन्यानंतर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हेदेखील मैदानात उपस्थित होते. ते केविन पीटरसन आणि एका महिला अँकरसोबत सामना आणि एमएस धोनी (MS Dhoni) यांच्याबद्दल बोलत होते. यादरम्यानच धोनी त्याच्या संघसहकाऱ्यांसोबत तिथून जात होता.

धोनीला जवळ येताना पाहून समालोचन करणारे गावसकर धावत जाऊन सुरक्षा घेरा तोडत त्याच्याजवळ पोहोचले. एमएस धोनी आणि सुनील गावसकर (MS Dhoni And Sunil Gavaskar) यांनी आधी एकमेकांची गळाभेट घेतली. गावसकर पेन घेऊन धोनीकडे पोहोचले होते. तसेच, त्यांनी धोनीकडून ऑटोग्राफसाठी हट्ट केला. त्यानंतर धोनीनेही गावसकरांच्या शर्टवर ऑटोग्राफ (MS Dhoni Autograph) दिला. यानंतर दोघांनी पुन्हा एकमेकांची गळाभेट घेतली. हा ऐतिहासिक क्षण ज्यानेही पाहिला, त्याने कौतुकाचे पूल बांधले.

‘धोनीसारखे खेळाडू शतकातून एकदा येतात’
यानंतर गावसकरांनी धोनीचे तोंडभरून कौतुक केले. ते म्हणाले की, “त्याने भारतासाठी खूप काही केले आहे. तो रोल मॉडेल आहे. भारताच्या अनेक युवा खेळाडूंसाठी तो प्रेरणा आहे. हा एक शानदार क्षण होता. मी जसे ऐकले की, तो मैदानाला चक्कर मारणार आहे. मी कोणाकडून तरी पेन घेऊन आपल्याजवळ ठेवला. धोनीसारखा खेळाडू शतकातून एकदा येतात.”

चेन्नई सुपर किंग्सची हंगामातील कामगिरी
चेन्नई सुपर किंग्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेत चांगली कामगिरी करत आहे. त्यांनी हंगामात 13 सामने खेळले असून त्यात 7 विजय, 5 पराभव आणि 1 अनिर्णित सामना पाहिला आहे. त्यांचे गुण 15 असून ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहेत. सीएसकेचा पुढील सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 20 मे रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर पार पडणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नई संघ प्ले-ऑफमध्ये सहज प्रवेश करू शकेल. (legend sunil gavaskar runs to get ms dhoni autograph see video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
IPL 2023मध्ये का घेतल्या नाहीत जास्त विकेट्स? दिग्गज नारायणने दिले ‘हे’ खळबळजनक उत्तर, वाचाच
राजस्थान 59 धावांवर Allout होऊनही विराट नाही खुश! म्हणाला, ‘मी बॉलिंग केली असती, तर फक्त…’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---