---Advertisement---

‘केवळ आधारच नाही, तर एक चांगला मित्रही गमावलाय’, दिवंगत वॉर्नची मुले झाली भावुक

On: मंगळवार, मार्च 8, 2022 4:05 PM
Shane-Warne-son
---Advertisement---

शुक्रवारी (४ मार्च) ऑस्ट्रेलियाचा दिग्गज लेग स्पिनर शेन वॉर्न याचे आकस्मित निधन झाले. त्याच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेट विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. थायलंडमध्ये सुट्टी घावलण्यासाठी गेलेल्या वॉर्नला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यामुळेच त्याचे निधन झाले. त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मुलांनाही मोठा धक्का बसला आहे.

वॉर्नच्या २२ वर्षीय मुलाने सांगितले की, त्याने स्वतःच सर्वात चांगल्या मित्र गमावला आहे. तसेच वॉर्नची मुलगी समरने वडिलांना शेवटची गळाभेट घेण्याची इच्छा होती, असे म्हटले.

मागच्या वर्षी टीव्ही रियालिटी शो एसएएस ऑस्ट्रेलियामधून लोकप्रियता मिळावलेला जॅकसन वॉर्न वडिलांच्या निधनानंतर म्हणाला, “माझा भाऊ, माझे सर्वात चांगले मित्र, माझ्या वडिलांवर मी खूप प्रेम करतो. मला नाही वाटत की, तुमच्या जाण्याने आमच्या मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कशाने भरून निघेल. पोकर टेबलवर बसणे, गोल्फ कोर्सवर चालणे आणि पिझ्झा खाणे, हे आता कधीच पहिल्यासारखे नसेल. पण मला माहितीये की, तुमची इच्छा हीच होती की, मी नेहमी आनंदात राहावे, मग काहीही होऊदे. त्यामुळे मी तेच करेल, आनंदात राहण्याचा प्रयत्न करेल. मला तुमची कमतरता जाणवेल. तुम्ही खरोखर सर्वश्रेष्ठ वडील आणि मित्र होता. मी तुमच्यावर खूप प्रेम करतो, लवकरच भेटू.”

शेन वॉर्न (Shane Warne) याची मोठी मुलगी ब्रुक म्हणाला की, “मी नेहमी आमच्या शेवटच्या आठवणी जपून ठेवेल. एकत्र बसून हसणे आणि विनोद करणे. आम्ही खूप आनंदी होतो. आपण खूप कारणांमुळे एकसारखेच होतो आणि मी नेहमी चेष्टा करायचे की, मला तुमचे गुण मिळाले आहेत. आता मला कधीच आनंद किंवा अभिमान वाटणार नाही की, मला तुमचे गुण मिळाले आहेत. मी नशीबवान आहे की, तुम्हाला नेहमी अभिमानाने माझे वडील म्हणेल. मला नेहमी तुमची कमतरता भासेल.”

वॉर्नची सर्वात लहान मुलगी समर म्हणाली की, “बाबा, मला आतापासूनच तुमची खूप आठवण येत आहे. जर मला माहिती असते की, तुमचे माझ्यासोबतचे हे शेवटचे क्षण आहेत आणि तुमचा शेवटचा श्वास थोड्याच अंतरावर आहे, तर मी तुम्हाला घट्ट मिठी मारली असती. मला तुमच्या सोबत अजून सुट्ट्या घालवायच्या होत्या, हसायचे होते, तुम्हाला प्रेमाने गुड नाइट म्हणायचे होते आणि सकाळी पुन्हा भेटू म्हणायचे होते, अजून गप्पा मारायच्या होत्या. आमचा दिवस कसा गेला, विचारायचात आणि जेव्हा मिठी मारायचात तेव्हा सुरक्षित वाटायचे.”

वॉर्नचे वडील किथ आणि आई ब्रिजिटने मुलाच्या निधनाविषयी बोलण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नसल्याचे सांगितले. ४ मार्चची रात्र त्यांच्या कुटुंबासाठी कधीच न संपणाऱ्या वाईट स्वप्नाची सुरुवात असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, “आम्हाला स्वतःचे दुःख व्यक्त करण्यासाठी शब्द शोधणे अशक्य काम आहे आणि शेनशिवाय भविष्याची कल्पना करू शकत नाही. आशा आहे की चांगल्या आठवणीमुळे दुःखाच्या प्रसंगातून बाहेर येण्यासाठी मदत मिळेल.”

महत्त्वाच्या बातम्या – 

पाकिस्तानी महिलांचा विश्वचषकात सलग दुसरा पराभव, ऑस्ट्रेलियाने ७ विकेट्सने मिळवला सोपा विजय

दीडशेपेक्षा जास्त धावा कुटल्यानंतर त्याच कसोटीत ८-९ विकेट्सही चटकावणारे अष्टपैलू, जडेजाचाही समावेश

Video: ‘बाबूजी जरा धीरे चलो’ गाण्यावर धवन-चहलची धमाल, एनसीएमधील कर्मचाऱ्यांबरोबरही मस्ती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---