---Advertisement---

दिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते- जसप्रीत बुमराह

On: मंगळवार, जानेवारी 15, 2019 7:44 PM
---Advertisement---

एडलेड। भारताने आज (15 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या वन-डे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. यामुळे दोन्ही संघ तीन वन-डे सामन्याच्या मालिकेत 1-1 असे बरोबरीत आहेत.

या सामन्यात यष्टीरक्षक एमएस धोनीने नाबाद 55 धावांची खेळी करत टिकाकरांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहिल्या सामन्यात संथ खेळी केल्याने त्याच्यावर टिका होत होत्या. मात्र आजच्या सामन्यात धोनीने कर्णधार विराट कोहलीची शतकी खेळी व्यर्थ न जाऊ देता उत्तम शॉट्स मारत सामना जिंकून दिला. यावेळी त्याने शेवटच्या षटकात षटकारही खेचला.

धोनीने या सामन्यात केलेल्या अर्धशतकी खेळीमुळे त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. यातच भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहनेही त्याचे आणि विराटचे अभिनंदन केले आहे.

‘दिग्गज लोकांना त्यांचे महत्त्व पटवून देण्याची गरज नसते’, असे ट्विट बुमराहने केले आहे.

भारतीय संघाला सध्या बुमराहची उणीव भासत आहे. त्याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत 21 विकेट्स घेत त्याच्या चांगल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. तो 2018 या वर्षात भारताचा सर्वाधिक विकेट घेणाराही गोलंदाज ठरला आहे.

बीसीसीआयने 12 जानेवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरु होणाऱ्या वनडे मालिकेतून तसेच त्यानंतर होणाऱ्या न्यूझीलंड दौऱ्यातील वनडे मालिकेतूनही विश्रांती दिली आहे. त्याच्या ऐवजी भारताच्या वनडे मालिकेत मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे.

सध्या सुरू असलेल्या मालिकेमध्ये संघाला शेवटच्या षटकामध्ये चांगलेच नुकसान होत आहे.  मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार हे दोघे उत्तम कामगिरी करत असून पदार्पणाच्या सामन्यातच सिराजला ऑस्ट्रेलियाने चांगलेच धुतले. त्याने 10 षटकात सर्वाधिक 76 धावा दिल्या.

बुमराहने 44 वन-डे सामन्यात खेळताना 4.44च्या इकॉनॉमी रेटने 78 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे

सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी

एमएस धोनी इज बॅक!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment