कतार येथे लीजेंड्स लीग क्रिकेट 2023 स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेतील तीन सामने पार पडले आहे. यातील तिसरा सामना सोमवारी (दि. 13 मार्च) दोहा येथे वर्ल्ड जायंट्स विरुद्ध आशिया लायन्स संघात पार पडला. पावसामुळे या सामन्यातील 10 षटके कमी करण्यात आली होती. अशात हा सामना आशिया लायन्स संघाने 35 धावांनी जिंकला. हा त्यांचा स्पर्धेतील सलग दुसरा विजय होता. या सामन्यात वर्ल्ड जायंट्स संघाला पराभवाचा धक्का बसला असला, तरीही संघाचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल याने केलेल्या फटकेबाजीमुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. यादरम्यानचा त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात वर्ल्ड जायंट्स (World Giants) संघाकडून खेळणारा वेस्ट इंडिज संघाचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल (Chris Gayle) जुन्या अंदाजात दिसला. या सामन्यात त्याने फक्त 23 धावांचीच खेळी साकारली, पण त्याने मारलेल्या सलग तीन षटकारांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या.
ख्रिस गेलने एकसोबत ठोकले सलग 3 षटकार
खरं तर, दोहा येथे पावसामुळे वर्ल्ड जायंट्स विरुद्ध आशिया लायन्स (World Giants vs Asia Lions) संघातील सामना 10 षटकांचा खेळवण्यात आला. यामुळे सामन्यातील रोमांच आणखी वाढला. सामन्यात नाणेफेक जिंकून आशिया लायन्स (Asia Lions) संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी लायन्सकडून खेळताना मिस्बाह उल हक याने 19 चेंडूत 44 धावा आणि तिलकरत्ने दिलशान याच्या 24 चेंडूतील 32 धावांमुळे 99 धावांचा डोंगर उभारला. हे आव्हानाचा पाठलाग करताना वर्ल्ड जायंट्सकडून ख्रिस गेल याने सलामीला फलंदाजी केली. तसेच, गोलंदाजांनाही घाम फोडला.
झाले असे की, सामन्यातील चौथे षटक टाकण्यासाठी दिलशान आला होता. तसेच, स्ट्राईकवर गेल खेळत होता. यावेळी गेलने दिलशानला बॅटमधून चोप चोप चोपले. त्याने पहिल्या तीन चेंडूवर जागेवरूनच षटकारांची हॅट्रिक मारली. गेलने दिलशानला पहिल्या चेंडूवर मिड विकेट स्टँडमध्ये पाठवले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने लाँग ऑन स्टँडमध्ये षटकार मारला. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने मिड विकेट आणि लाँग ऑनच्या मधून स्टँड्समध्ये खणखणीत षटकार मारला. यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
Always entertaining to see the universal BOSS in action.@henrygayle @visitqatar#LegendsLeagueCricket #SkyexchnetLLCMasters #LLCT20 #YahanSabBossHain #ALvsWG pic.twitter.com/44L6CsobfZ
— Legends League Cricket (@llct20) March 13, 2023
या सामन्यात ख्रिस गेल याने 16 चेंडूत 23 धावा केल्या. या धावांमध्ये 3 षटकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, गेलनेच जायंट्स संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त फक्त लेंडल सिमन्स याने 14 धावा केल्या. इतर एकही फलंदाज 10 धावांचा आकडा पार करू शकला नाही. (legends league cricket 2023 chris gayle hits 3 consecutive sixes video viral)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आरसीबीचा खेळ अजून संपला नाही! एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी अशी आहेत समीकरणे, जाणून घ्याच
बापरे एवढा पैसा..! ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत 5 क्रिकेटपटू, भारतातील तिघांचा समावेश