Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बापरे एवढा पैसा..! ‘हे’ आहेत जगातील सर्वात श्रीमंत 5 क्रिकेटपटू, भारतातील तिघांचा समावेश

बापरे एवढा पैसा..! 'हे' आहेत जगातील सर्वात श्रीमंत 5 क्रिकेटपटू, भारतातील तिघांचा समावेश

March 14, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Virat-Kohli

Photo Courtesy: Instagram/virat.kohli


जगातील सर्वात लोकप्रिय खेळांमध्ये क्रिकेटची गणना होते. क्रिकेट या खेळाला शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास लाभला आहे. अनेक देशांमधील क्रिकेट हा सर्वात मोठा खेळ बनला आहे. गरीब घरातून आलेल्या अनेक खेळाडूंनी क्रिकेटच्या दुनियेत पाय रोवून आपले आयुष्य बदलले आहे. टी20 क्रिकेट खेळून अनेक खेळाडू नावलौकिकता मिळवताना दिसले, त्यामुळे त्यांच्या राहणीमानातही पूर्ण बदल होतो. मात्र, सध्या क्रिकेट खेळून अनेक खेळाडू श्रीमंत झाल्याचे दिसत आहे. मात्र, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत पहिल्या दोन स्थानावर क्रिकेट न खेळणारे खेळाडू विराजमान आहेत. चला तर त्या श्रीमंत खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात…

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू
ऍडम गिलख्रिस्ट
यादीत अव्वलस्थानी ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज ऍडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) आहे. त्याने 2008मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो समालोचकाच्या भूमिकेत झळकताना दिसतो. याव्यतिरिक्त त्याचे अनेक व्यवसायदेखील आहेत. त्याची एकूण संपत्ती ही तब्बल 380 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 3130 कोटी रुपये आहे.

सचिन तेंडुलकर
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा क्रमांक लागतो. सचिन हा भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. मात्र, जगात तो दुसऱ्या स्थानी आहे. अव्वलस्थानी असलेल्या गिलख्रिस्टपेक्षा सचिन खूपच मागे आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, 2012 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या सचिनची एकूण संपत्ती 170 मिलियन डॉलर्स इतकी आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार सचिनची एकूण संपत्ती ही जवळपास 1400 कोटी इतकी आहे.

एमएस धोनी
जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत एमएस धोनी (MS Dhoni) याचाही समावेश आहे. तो भारतातील दुसरा, तर जगातील तिसरा श्रीमंत क्रिकेटपटू आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याची एकूण संपत्ती 115 मिलियन डॉलर्स म्हणजेच भारतीय चलनानुसार जवळपास 947 कोटी आहे. धोनीने 2020मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला होता. मात्र, तो आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. कदाचित आयपीएल 2023हा त्याचा शेवटचा हंगाम असू शकतो.

विराट कोहली
जगातील अनेक विक्रम मोडीत काढण्याची क्षमता बाळगणारा विराट कोहली (Virat Kohli) श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत चौथ्या स्थानी आहे. तो तिसरा श्रीमंत भारतीय आहे. विराट एक क्रिकेटपटूसोबतच फिटनेस आयकॉनदेखील आहे. तो त्याच्या फिटनेसमुळे अनेकांसाठी प्रेरणा ठरला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, त्याची एकूण संपत्ती 112 मिलियन डॉलर्स आहे. भारतीय चलनानुसार त्याची एकूण संपत्ती ही जवळपास 922 कोटींपेक्षा जास्त आहे.

रिकी पाँटिंग
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंच्या यादीत पाचव्या स्थानी आहे. तो गिलख्रिस्टनंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू आहे. मात्र, दोघांच्या संपत्तीत जमीन आस्मानाचा फरक आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, पाँटिंगची एकूण संपत्ती तब्बल 75 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार त्याची एकूण संपत्ती 617 कोटींपेक्षा जास्त आहे. (top 5 richest cricketers in world full list sachin tendulkar ms dhoni and virat kohli but adam gilchrist on top)

जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू
380 मिलियन डॉलर्स- ऍडम गिलख्रिस्ट
170 मिलियन डॉलर्स- सचिन तेंडुलकर
115 मिलियन डॉलर्स- एमएस धोनी
112 मिलियन डॉलर्स- विराट कोहली
75 मिलियन डॉलर्स- रिकी पाँटिंग
70 मिलियन डॉलर्स- जॅक कॅलिस
60 मिलियन डॉलर्स- ब्रायन लारा
40 मिलियन डॉलर्स- वीरेंद्र सेहवाग
35 मिलियन डॉलर्स- युवराज सिंग
30 मिलियन डॉलर्स- स्टीव्ह स्मिथ

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू मला लय वाट पाहायला लावलीस…’, मुलाखतीत कोच द्रविड विराटला असे का म्हणाले? पाहा व्हिडिओ
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम


Next Post
Chandrakant Patil

मावळ तालुक्यात क्रिकेटच्या मैदानावर पालकमंत्री चंद्रकांत पाटलांची तुफान फटकेबाजी - व्हिडिओ

Smriti-Mandhana

आरसीबीचा खेळ अजून संपला नाही! एलिमिनेटर सामना खेळण्यासाठी अशी आहेत समीकरणे, जाणून घ्याच

David-Warner

WTC फायनमधून वॉर्नरचा पत्ता कट झाला? ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांनी दिले उत्तर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143