लेजेंड्स लीग क्रिकेट 2024 च्या नव्या हंगामाला सुरूवात झाली आहे. जोधपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात इरफान पठाणच्या कोर्नक सूर्या ओडिशाने हरभजन सिंगच्या नेतृत्वाखाली मणिपाल टायगर्सचा 2 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना कोर्नक सूर्या संघाने 20 षटकांत 9 गडी गमावून 104 धावा केल्या. प्रत्युत्तरात मणिपाल टायगर्स संघाला 20 षटकांत 8 गडी गमावून केवळ 102 धावा करता आल्या. कोर्नाकच्या विजयाचा हिरो ठरला कर्णधार इरफान पठाण ज्याने शेवटच्या चेंडूवर 3 धावांचा बचाव केला.
तत्पूर्वी, हरभजन सिंगने नाणेफेक जिंकून इरफान पठाणच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्याचा निर्णय योग्य ठरला. प्रथम फलंदाजीला आलेल्या कोणार्क सूर्याची सुरुवात अजिबात चांगली झाली नाही. संघाने केवळ 32 धावांत 4 विकेट गमावल्या. रिचर्ड लेव्ही (6) अंबाती रायुडू (8) आणि केविन ओब्रायन केवळ (6) धावा करू शकले. रॉस टेलरही 14 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. कर्णधार इरफान पठाणने 23 चेंडूत 18 धावांची खेळी केली. खालच्या फळीत नेविन स्टीवर्टने 12 चेंडूत 17 धावा आणि विनय कुमारने 5 चेंडूत 11 धावा करत संघाला 100 धावसंख्येच्या पुढे नेले. अनुरीत सिंगने 2 तर हरभजन सिंगने 1 बळी घेतला.
What a start to the Jalwa 🤩#BossLogonKaGame #LegendsLeagueCricket #KSOvMT #LLCSeason3 #LLCT20 #Jodhpur pic.twitter.com/y7KialkHbM
— Legends League Cricket (@llct20) September 20, 2024
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मणिपाल टायगर्सची सुरुवात आणखी वाईट झाली. अवघ्या 4 धावांत संघाने 3 विकेट गमावल्या. रॉबिन उथप्पा आणि सोलोमन मीर यांना खातेही उघडता आले नाही. तर मनोज तिवारी फक्त 2 धावा करू शकला आणि सौरभ तिवारीला देखील फक्त 5 धावा करता आल्या. अवघ्या 38 धावांत संघाने 6 विकेट गमावल्याने सामना एकतर्फी होईल असे वाटत होते. मात्र खालच्या फळीत डॅनियल ख्रिश्चनने 38 चेंडूत 30 धावा करून डाव सांभाळला आणि ओबुस पिनारने 24 चेंडूत 34 धावा केल्या. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 3 धावांची गरज होती मात्र इरफान पठाणने ओबास पिनारला बाद करून संघाला विजय मिळवून दिला. इरफानने 1 तर शाहबाज नदीम आणि विनय कुमार यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले.
हेही वाचा-
5 दिग्गज खेळाडू ज्यांना संघातून कधीही वगळण्यात आले नाही
बर्थडे बॉय राशिद खानचा विश्वविक्रम! 53 वर्षांच्या वनडे इतिहासात अशी कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
‘रशीद’ आणि ‘गुरबाज’समोर आफ्रिकन संघाचे लोटांगण, अफगाणिस्तानने रचला इतिहास; मालिका ताब्यात