भारतात क्रिकेट या खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इथे क्रिकेटपटूंना खेळाडू कमी देव जास्त मानले जाते. याच भारत देशात जन्मलेला एखादा क्रिकेटर परदेशात त्याचा ठसा उमटवत असेल, तरीही भारतीयांची छाती गर्वाने फुगते. नुकत्याच दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेदरम्यान खेळाडूंइतकीच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त चर्चा झाली होती, ती मुळचे कोकणचे असलेले तिसरे पंच (थर्ड अंपायर) अल्लाहुद्दीन पालेकर यांची.
आता पालेकरांनंतर अशाच एका पंचाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. परंतु हा पंच पुरुष नसून ती एक महिला (Female Umpire in Cricket) आहे. त्यांचे नाव आहे, शुभदा भोसले- गायकवाड (Shubhda Bhosle Gaikwad).
व्हिडिओ पाहा- अतिशय महान खेळाडू जेव्हा स्वार्थापोटी आपली महानता विसरले
निवृत्त क्रिकेटपटूंसाठी संयुक्त अरब अमिरातीत आयोजित करण्यात आलेल्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये शुभदा पंचगिरी करत आहेत. त्या भारतीय असून क्रिकेटमध्ये पंचगिरी करणाऱ्या भारतातील सर्वात युवा महिला पंचही आहेत.
शुभदा यांच्याविषयी थोडसं…
शुभदा भोसले- गायकवाड या भारतातील मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर शहरात राहतात. त्यांनी ग्वाल्हेर मधील लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्यूकेशन येथून आपले महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. त्या सध्या मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील थांदला कॉलेजमध्ये त्या क्रिडा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांचे पती सुजय गायकवाड हे भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटमध्ये काम करतात.
त्या लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि हॉन्गकॉन्गच्या महिला पंचांसोबत पंचगिरी करत आहेत. या सर्व महिला पंचांमध्ये शुभदा सर्वात युवा आहेत.
इंडिया महाराजा वि. एशिया लायन या सामन्यात केली पंचगिरी
शुभदा या लिजेंड्स क्रिकेट लीगमधील २० जानेवारी रोजी झालेल्या सामन्यात पहिल्यांदा पंचगिरीसाठी उतरल्या होत्या. हा सामना इंडिया महाराजा आणि एशिया लायन संघात झाला होता. या सामन्यानंतर त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून भारतीय क्रिकेटप्रेमी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
पहिल्यांदाच खेळल्या जात असलेल्या लिजेंड्स लीग क्रिकेटद्वारे महिला सशक्तिकरणाचा संदेश जगभर जावा म्हणून महिला पंचांना संधी देण्यात आली आहे.
दरम्यान या लीगमध्ये एकूण ३ संघ विजेतेपदासाठी आमने सामने आहेत. यामध्ये भारतीय क्रिकेटपटूंचा सहभाग असलेल्या संघाचे नाव इंडिया महाराजा असे आहे. या संघाचे नेतृत्त्व मोहम्मद कैफ करतो आहे. तर इतर दोन संघ एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स असे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
रडू की हसू…! एकाच चेंडूवर २ वेळा गेली विकेट, विचित्र पद्धतीने रनआऊट झाला आंद्रे रसेल
‘चांगला खेळ, पण मर्यादा ओलांडू नकोस’, पंतची विकेट घेणाऱ्या द. आफ्रिकी गोलंदाजाची खास पोस्ट
हेही पाहा-