---Advertisement---

कतारमध्ये घोंगावलं रॉबिन उथप्पा नावाचं वादळ! पाकिस्तानी गोलंदाजांना चोप चोप चोपलं, फक्त 39 चेंडूत…

On: बुधवार, मार्च 15, 2023 5:26 PM
Robin-Uthappa
---Advertisement---

लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेतील पहिल्या दोन सामन्यात इंडिया महाराजा संघाने निराशाजनक कामगिरी केली. मात्र, तिसऱ्या सामन्यात संघाने आपला दम दाखवून दिला. मंगळवारी (दि. 14 मार्च) स्पर्धेतील चौथा सामना आशिया लायन्स विरुद्ध इंडिया महाराजा संघात पार पडला. हा सामना महाराजांनी 10 विकेट्सने जिंकला. या सामन्यातील कामगिरीसाठी रॉबिन उथप्पा याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, उथप्पा आणि गौतम गंभीर यांनी लायन्स संघातील पाकिस्तानी गोलंदाजांना अक्षरश: घाम फोडला. तसेच, संघाला स्पर्धेतील पहिला सामना जिंकून दिला.

आशिया लायन्स विरुद्ध इंडिया महाराजा (Asia Lions vs India Maharajas) संघातील चौथ्या सामन्यातील नाणेफेकीचा निकाल इंडिया महाराजा (India Maharajas) संघाच्या बाजूने लागला. त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतल आशिया लायन्स (Asia Lions) संघाला फलंदाजीसाठी पाचारण केले. यावेळी लायन्सने निर्धारित 20 षटकात 5 विकेट्स गमावत 157 धावांचा पाऊस पाडला.

या आव्हानाचा पाठलाग करताना महाराजा संघाकडून रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याने वादळी फलंदाजी केली. त्याने 39 चेंडूत 88 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 5 षटकार आणि 11 चौकारांचा वर्षाव केला. उथप्पाने या सामन्यात 225च्या स्ट्राईक रेटने धावा चोपल्या. त्याला कर्णधार गौतम गंभीर (Gautam Gambhir) यानेही साथ दिली. गंभीरने यावेळी 36 चेंडूत 61 धावांची वादळी खेळी साकारली. त्याने या धावा करताना 12 चौकारांचा पाऊस पाडला.

आशिया लायन्सकडे सोहेल तन्वीर, मोहम्मद आमिर, मोहम्मद हाफिज आणि शोएब अख्तर यांसारखे वेगवान गोलंदाज होते. तरीही इंडिया महाराजा संघाने धमाल केली. सोहेलने फक्त 2 षटके गोलंदाजी करत 22 धावा खर्च केल्या. तसेच, हाफीजने 2 षटकात 33 धावा दिल्या.

खरं तर, महाराजा संघाचा मागील 3 सामन्यातील हा पहिलाच विजय होता. यापूर्वीच्या दोन्ही सामन्यात संघाला अनुक्रमे आशिया लायन्सकडून 9 विकेट्सने आणि वर्ल्ड जायंट्सकडून 2 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. गुणतालिकेबाबत बोलायचं झालं, तर सध्या पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश संघाच्या खेळाडूंनी सजलेला आशिया लायन्स संघ 2 विजयांसह गुणतालिकेत अव्वलस्थानी आहे. तसेच, 2 गुणांसह दुसऱ्या स्थानी इंडिया महाराजा संघ आहे, तर तिसऱ्या स्थानी वर्ल्ड जायंट्स संघ आहे. त्यांचेही 2 गुण आहेत.

या स्पर्धेत एकूण 3 संघ खेळत आहेत. त्यात इंडिया महाराजा, वर्ल्ड जायंट्स आणि आशिया लायन्स संघांचा समावेश आहे. तिन्ही संघात आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणारे क्रिकेटपटू भाग घेत आहेत. यात शेन वॉटसन, ख्रिस गेल, शाहिद आफ्रिदी, गौतम गंभीर यांच्यासह अनेक खेळाडूंच्या नावाच समावेश आहे. (legends league cricket masters cricketer robin uthhapa batting 5 sixes pakistani bowler)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ट्विटरवर अडचणीत सापडला अश्विन! थेट एलॉन मस्कला टॅग करत मागितला सल्ला, नक्की काय घडलंय वाचाच
Video- मोबाईलमध्ये रमलेल्या धवनने वडिलांना दिले नाही पाणी; संतापलेली बहीण म्हणाली, ‘पप्पा, हा खूप…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---