---Advertisement---

लिजेंड्स क्रिकेट लीग: विरेंद्र सेहवागऐवजी मोहम्मद कैफ करणार भारताचे नेतृत्त्व, ‘हे’ आहे कारण

On: गुरूवार, जानेवारी 20, 2022 3:53 PM
Virender Sehwag and Mohammad Kaif
---Advertisement---

गुरुवारपासून (२० जानेवारी) निवृत्त खेळाडूंची लीजेंड्स लीग क्रिकेट ही स्पर्धा इंडिया महाराजा, एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स या तीन संघात ओमानमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचा दिग्गज सलामीवीर विरेंद्र सेहवाग याच्याकडे कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, आता तो या स्पर्धेतील सुरुवातीचे सामने खेळणार नसल्याचे समजत आहे. 

सेहवागने वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीच्या सामन्यांमधून माघार घेतली आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी टी२० स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मोहम्मद कैफ इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व करणार आहे. गुरुवारी भारताचे प्रतिनिधित्त्व करत असलेला इंडिया महाराजा संघाचा पहिला सामना मिसहाब उल हकच्या नेतृत्वाखालील संघ एशिया लायन्सशी होणार आहे. ही स्पर्धा २९ जानेवारीपर्यंत समाप्त होईल.

कैफने स्पर्धेच्या पूर्वसंध्येला सांगितले की, “सेहवाग वैयक्तिक कारणांमुळे सुरुवातीचे काही सामने खेळू शकणार नाही. तो नंतर संघात सामील होईल. मी पहिल्या दोन सामन्यांमध्ये इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व करणार आहे.”

यापूर्वी असे सांगण्यात आले होते की, गुरुवारपासून सुरु होणाऱ्या लीजेंड्स लीग क्रिकेट टी२० स्पर्धेत इंडिया महाराजा संघाचे नेतृत्व माजी स्फोटक सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवाग करेल.

अधिक वाचा – लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये दिसणार सेहवाग, भज्जीसहित ‘या’ दिग्गजांचा जलवा; पाहा संपूर्ण संघ

याशिवाय पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसहाब उल हक हा एशिया लायन्स संघाचा कर्णधार असणार आहे. या संघात पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि अफगानिस्तानच्या खेळाडूंचा सहभाग असणार आहे. या संघात शाहिद अफ्रिदी, शोएब अख्तर, मोहम्मद हाफिज, उमर गुल, सनथ जयसूर्या, तिलकरत्ने दिलशान, चमिंडा वास आणि हबिबुल बशर या खेळाडूंचा सामावेश असणार आहे. एशिया लायन्सने दिलशानची उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे, तर १९९६चा आयसीसी विश्वचषक विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा याला प्रशिक्षक म्हणून निवडले केले.

व्हिडिओ पाहा – २०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही 

‘वर्ल्ड जायंट्स’ या स्पर्धेतील तिसऱ्या संघाचे नेतृत्व वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरेन सॅमी करणार आहे. न्यूझीलंडचा माजी कर्णधार डॅनियल व्हिट्टोरी, ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज ब्रेट ली, इंग्लंडचा केविन पीटरसन, दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज इम्रान ताहीर हे खेळाडू या संघात असतील. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज जॉन्टी ऱ्होड्स वर्ल्ड जायंट्स संघाचा खेळाडूसह मार्गदर्शक असणार आहे.

लीजेंड्स लीग क्रिकेट टी२० स्पर्धेचे आयुक्त रवी शास्त्री म्हणाले की, “हे खेळाडू निवृत्त झाले आहेत, परंतु तरीही ते क्रिकेटबद्दल खूप उत्कट आहेत. मला खात्री आहे की ते पुढील १० दिवसांत त्यांच्या संघांसाठी त्यांचे अतिरिक्त कौशल्य दाखवतील.”

महत्त्वाच्या बातम्या – 

अखेर अब्रू राखली! आयसीसी २०२१ कसोटी संघात ‘भारतीय त्रिमूर्ती’ सामील; विलियम्सनकडे नेतृत्व

असे तीन भारतीय खेळाडू, जे २०१८ दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा होते भाग, पण यंदा वनडेत संधी नाही

आयसीसी वनडे टीम ऑफ द ईयर पाहून व्हाल चकीत! भारतच नाही, तर इंग्लंड, ऑस्ट्रेलियन खेळाडूंनाही स्थान नाही

२०११ विश्वचषक भारताचे हिरो, ज्यांचे योगदान आज कोणाला आठवत नाही | India's Unsung heroes of 2011WC

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---