भारताचे सर्वकालीन महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना इंग्लंडमध्ये मोठा सन्मान मिळणार आहे. लीसेस्टर क्रिकेट मैदानाला सुनील गावसकर यांचे नाव दिले जाणार आहे. मैदान व्यवस्थापनाने नुकतीच ही घोषणा केली. सुनील गावसकर हे पहिले भारतीय क्रिकेटपटू आहेत ज्यांचे नाव इंग्लंड किंवा युरोपमधील एखाद्या मैदानाला दिले जाईल. परदेशातील मैदानाला भारतीय खेळाडूचे नाव देणे हा खरोखरच मोठा सन्मान समजला जात आहे.
Congratulations to India’s global cricket ambassador, the living Legend and Marathi Manus, Sunil Gavaskar, for being the first Indian cricketer to have a ground named after him in Kentucky (US), Zanzibar (Tanzania), and now Leicester (England).
Truly proud of him#SunilGavaskar pic.twitter.com/o7GaCeAREY— Satyajeet Tambe (@satyajeettambe) July 22, 2022
सुनील गावसकर यांनीही या सन्मानाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “या सन्मानाने मी खूप आनंदी आहे. लीसेस्टर मैदानाला माझे नाव देणे ही खरोखरच मोठी उपलब्धी आहे. लीसेस्टर हे क्रिकेट चाहत्यांचे शहर मानले जाते. विशेषतः भारतीय क्रिकेटसाठी हा विशेष सन्मान आहे.”
या स्टेडियमच्या नावाचे उद्घाटन करण्यासाठी सुनील गावसकर हे शनिवारी इंग्लंडला रवाना होणार आहेत. हे मैदान भारत स्पोर्ट्स अँड क्रिकेट क्लबच्या मालकीचे आहे. गावसकर यांची प्रतिमा पॅव्हेलियनच्या संपूर्ण भिंतीवर आधीच रंगवण्यात आली आहे. या स्टेडियमचे नाव सुनील गावसकर यांच्या नावावर ठेवण्याची कल्पना भारतीय वंशाचे सर्वाधिक काळ काम करणारे ब्रिटिश संसद सदस्य कीथ वाझ यांनी दिली होती. त्यांनी ३२ वर्षे इंग्लंडच्या संसदेत लीसेस्टरचे प्रतिनिधित्व केले आहे. सध्या ते इंटिग्रेशन फाऊंडेशन नावाच्या प्रवासी संस्थेची देखभाल करतात.
अमेरिकेतील केंटकी येथील क्रिकेट स्टेडियम आणि टांझानियामधील जँसीबार येथील स्टेडियमनादेखील सुनील गावसकर यांचे नाव देण्यात आले आहे. गावसकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत १२५ कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने ५१.१२ च्या सरासरीने १०१२२ धावा केल्या होत्या. त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये ३४ शतके आहेत. वनडे क्रिकेटमध्ये त्यांनी १०८ सामन्यात ३०९२ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
WIvIND: ‘या’ भारतीयांनी सर्वाधिक कॅरेबियन फलंदाजांना दाखवलाय तंबूचा रस्ता; दिग्गजांसह युवाही सामील
बीसीसीआयचे ८६.२१ कोटी देण्यास बायजूसचा नकार?, पेटीएमही सोडणार स्पॉन्सरशिप, वाचा संपूर्ण प्रकरण