---Advertisement---

‘मनाचा किंग’ कोहली! विरोधी संघातील खेळाडूसाठी चाहत्यांशी भिडला विराट, व्हिडिओ होतोय व्हायरल

On: रविवार, जून 26, 2022 2:03 PM
---Advertisement---

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात कसोटी सामन्यापूर्वी सराव सामना खेळत आहेत. लिसेस्टरशायर विरूद्ध भारत (Leicestershire vs India) हा सराव सामना गुरूवारी (२३ जून) सुरू झाला आहे. चार दिवस चालणाऱ्या या सामन्यामध्ये भारताचे काही खेळाडू लिसेस्टरशायकरडून खेळत आहेत. यामध्ये भारतीय संघाने पहिला डाव २४६ धावांवर घोषित केला. याच्या प्रत्युत्तरात लिसेस्टरशायरने २४४ धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा युवा गोलंदाज कमलेश नागरकोटी हा या सामन्यात लिसेस्टरशायर कडून खेळत आहे.

सामन्यादरम्यान नागरकोटी सीमारेषेजवळ उभा असताना प्रेक्षकांमधून एकाने त्याला फोटो काढण्याची मागणी केली. त्या प्रेक्षकाने म्हटले, “किती वेळापासून बोलवत आहे, तो फोटो काढत नाही. मी येथे माझे काम सोडून आलो आहे. त्याने कमीत कमी एकतरी फोटो काढायला पाहिजे.” हा प्रकार विराट कोहली (Virat Kohli) याने पाहिला. विराटला राहवले न गेल्याने त्याने त्या प्रेक्षकाला, ‘तो सामना खेळायला आला आहे फोटो काढण्यासाठी नाही’ असे खडे बोल सुनावले आहे.

या सामन्यात नागरकोटीने दोन विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकूर यांना बाद केले आहे. दुसऱ्या डावात भारताने ७ विकेट्स गमावत ३६४ धावा केल्या आहेत. या डावात भारताच्या हनुमा विहारी, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके केली आहेत. जडेजा ५६ आणि मोहम्मद सिराज एक धाव करत खेळपट्टीवर उपस्थित आहेत. या दोन्ही डावात केएस भरतने नाबाद ७० आणि ४३ धावा केल्या आहेत. रिषभ पंतने लिसेस्टरशायरकडून खेळताना ७६ धावा केल्या आहेत. एकंदरच भारताचे दोन्ही यष्टीरक्षक-फलंदाज उत्तम कामगिरी करत आहेत

या सराव सामन्यात भारताच्या फलंदाजांबरोबर गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या जडेजाने तीन विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्याबरोबर शमी आणि कृष्णा यांनीही प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या आहेत.

या सामन्यानंतर भारतीय संघ १ ते ५ जुलै दरम्यान इंग्लंड विरुद्ध एजबस्टन, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहे. या महत्वाच्या सामन्याआधीच भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कोविड पॉजिटिव्ह आढळला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

प्रदर्शनाने नव्हे पण कर्माने पृथ्वी शॉ ठरला मोठा!! पाऊस आल्यावर ग्राउंड स्टाफला मैदान झाकण्यास केली मदत

अजब गजब! चेतेश्वर पुजाराने दोन्ही टीमकडून केली बॅटींग, व्हिडिओ व्हायरल

आयर्लंड विरुद्धच्या सामन्यांसाठी गावसकरांनी सुचविले ‘विकेटकिपर’चे नाव

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---