---Advertisement---

अशी आहे सिमन्सची ‘ऑल टाईम टी२० ११’; चार भारतीयांना दिली संधी

On: सोमवार, नोव्हेंबर 22, 2021 7:57 PM
---Advertisement---

वेस्ट इंडीज संघाचा विस्फोटक सलामीवीर फलंदाज आणि अष्टपैलू लेंडल सिमन्सने त्याला आवडणाऱ्या ११ दिग्गज खेळाडूंचा टी२० संघ निवडला आहे. त्याने संघाता भारताचा माजी कर्णधार एम एस धोनीला देखील सामील केले आहे. त्याव्यतिरिक्त जगभरातील इतर दिग्गजांनाही सिमन्सने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले आहे. असे असले तरी, मुंबई इंडियन्स संघातील त्याचा जुना सहकारी लसिथ मलिंगाला मात्र त्याने या संघात संधी दिलेली नाही. त्याने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये भारतीय संघाच्या सर्वाधिक चार खेळाडूंचा सामावेश आहे.

लेंडल सिमन्सने एका क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत त्याची ही प्लेइंग इलेव्हन निवडली आहे. मुलाखतीदरम्यान वेस्ट इंडीज संघाचा माजी खेळाडू डॅरेन गंगाने त्याला त्याच्या आवडत्या ११ खेळाडूंचा टी२० संघ निवडायला सांगितला, त्यानंतर सिमन्सने हा संघ निवडला.

सिमन्सने त्याच्या संघात सलामीवीर फलंदाजाच्या रूपात वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेल आणि भारताचा रोहित शर्मा यांना निवडले. या दोन्ही खेळाडूंनी त्यांच्या संघांसाठी अनेकदा महत्वाची खेळी केली आहे आणि अनेक टी२० सामने जिंकवून दिले आहेत. गेलच्या नावावर आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वात मोठी खेळी करण्याचा विक्रम आहे, त्याव्यतिरिक्तही त्याने अनेकदा मोठी धावसंख्या केली आहे. तर, दुसरीकडे रोहित शर्माने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये चार शतके केले आहेत.

सिमन्सने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला निवडले आहे. तसेच रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील विराटचा सहकारी आणि दक्षिण अफ्रिका संघाचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सलाही सिमन्सने संघात सामील केले आहे. डिविलियर्स चौथ्या क्रमांकासाठी निवडला गेला. त्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी वेस्ट इंडीज संघाचा कर्णधार कायरन पोलार्डला त्याने निवडले आहे. एमएस धोनीला फिनिशरच्या रूपात सहाव्या स्थानावर ठेवले गेले आहे, तसेच सिमन्सने धोनीला संघाचा कर्णधार देखील केले. त्यानंतर सातव्या क्रमांकावर ड्वेन ब्रावोला ठेवले गेले आहे.

गोलंदाजांमध्ये सिमन्सने दोन फिरकी आणि दोन वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. फिरकी गोलंदाजांमध्ये त्याने अफगाणिस्ताचा राशिद खान आणि सुनील नरीन या दोघांना संधी दिली. तर वेगवान गोलंदाजांनी भारताचा भुवनेश्वर कुमार आणि कगिसो रबाडा यांना सामील केले आहे.

लेंडल सिमन्सने निवडलेला टी२० संघ –

ख्रिस गेल, रोहित शर्मा, विराट कोहली, एबी डिविलियर्स, कायरन पोलार्ड, एम एस धोनी (कर्णधार), ड्वेन ब्रावो, राशिद खान, सुनील नरीन, भुवनेश्वर कुमार आणि कगिसो रबाडा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---