लंडन | इंग्लंडमध्ये या आठवड्यात सर्व प्रकारच्या स्तरावरील क्रिकेटपटूंच्या बुटांच्या लेसचा रंग इंद्रधनुष्यासारखा असणार आहे. एलजीबीटी (LGBT- lesbian, gay, bi and trans) खेळाडू आणि चाहत्यांचा हा खास आठवडा साजरा करण्यासाठी बुटांच्या लेसचा रंग बदलण्यात येणार आहे.
हे कॅंपेन इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून राबविण्यात येते. याचे हे दुसरे वर्ष आहे. क्रिकेट हे सर्वांसाठी आहे. त्यात कोणताही भेदभाव होत नाही. असे या कॅंपेनमधून जगाला सांगायचे आहे.
गेल्यावर्षी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने टी२० ब्लास्ट आणि महिला क्रिकेट सुपर लीगमध्येही खेळाडूंसोबत हे कॅंपेन केले होते. यावेळी हे कॅंपेन २७ जूलै ते २९ जूलै या काळात राबविण्यात येणार आहे.
Good to see @ECB_cricket getting involved with @PrideInLondon … #LGBT issues in sport extend further than football and the Premier League… 🏳️🌈🏏 pic.twitter.com/VfYkHwPakB
— Tom Carr (@ItsMeTomC) July 5, 2018
Cricketers across England will this weekend be donning rainbow laces in support of cricket's LGBT community, as part of an initative between @ECB_cricket and @stonewalluk 🏳️🌈
➡️ https://t.co/Tb1zwWkK5y pic.twitter.com/brJfhOLD16
— ICC (@ICC) July 27, 2018
🏳️🌈 | Cricket is for everyone. We’re wearing #RainbowLaces at our @VitalityBlast game tonight vs Derbyshire Falcons to show LGBT fans and players are welcome at our club #Blast18 @stonewalluk
Read more here ▶️ https://t.co/U12g4nL9ui
🦊 #followthefoxes pic.twitter.com/sYnx4oRdgY
— Leicestershire CCC 🦊 (@leicsccc) July 27, 2018
यावेळी केवळ लेस नाही तर स्टंप, झेंडे आणि मोठ्या स्क्रीनवरही रंग बदलुन या कॅंपेनला पाठींबा दिला जाणार आहे. हे सर्व तीन दिवस टी२० ब्लास्ट आणि महिला क्रिकेट सुपर लीगच्या सर्व सामन्यात दिसणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?
-त्या गोलंदाजाचा इंग्लंडच्या कसोटी संघात समावेश करणे ‘हास्यास्पद’
-टीम इंडियासाठी खुशखबर! दोन महत्त्वाचे गोलंदाज सराव सामन्यात चमकले