भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी हे दोघेही खूप चांगले मित्र आहेत. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून तो फक्त आयपीएल स्पर्धेतच झळकताना दिसून येतो. परंतु हार्दिक पंड्या हा धोनीला भेटण्याचे कारणच शोधत असतो. गतवर्षी त्याने धोनीच्या वाढदिवसाच्या वेळी, रांचीमध्ये उपस्थिती दर्शविली होती.
येत्या काही दिवसातच आयपीएल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. हे दोघेही खेळाडू एकमेकांविरुद्ध खेळताना दिसून येणार आहे. अशातच हार्दिक पंड्याने सोशल मीडियावर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शनदेखील दिले आहे.
येत्या आयपीएल हंगामासाठी हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे सोमवारी (२९ मार्च) मुंबई इंडियन्स संघात सहभागी झाले आहेत. त्यांनतर हार्दिकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर धोनीचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ३९ वर्षीय धोनी, तरुण आणि हँडसम दिसून येत आहे. या फोटोला त्याने मजेशीर कॅप्शन देत लिहिले आहे की, “काय माही भाई टाईम ट्रॅव्हलिंग करायला देखील सुरुवात केली का?”
या फोटोला सोशल मीडियावर प्रचंड शेअर केले जात आहे. तसेच अनेक चाहते आपली प्रतिक्रिया देखील देत आहेत. एका चाहत्याने लिहिले की, “माही भाई काहीही करू शकतात.”
https://www.instagram.com/p/CM_9DSuDyeL/?utm_source=ig_web_button_share_sheet
येत्या ९ एप्रिलपासून हे दोघेही खेळाडू आप-आपल्या संघासाठी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडताना दिसून येणार आहेत. आयपीएल २०२० च्या हंगामात चेन्नई संघाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघ चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर मुंबई इंडियन्स संघाकडे विजयाची हॅटट्रिक करण्याची संधी असणार आहे.
इंग्लंड विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत हार्दिकने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे आगामी हंगामात मुंबई इंडियन्स संघाला हार्दिक पंड्याकडून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
“रिषभ पंतविना भारतीय संघाची कल्पनाच करु शकत नाही,” इंग्लिश दिग्गजाने उधळली स्तुतिसुमने
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका गाजवणारा ‘हा’ भारतीय गोलंदाज, आता मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळण्यास सज्ज
इंग्लंडचा भारत दौरा संपल्यानंतर कुठे पोहोचला कोहली? ‘या’ दिवशी होणार आरसीबीत सहभागी






