इंग्लंड संघाचा विस्फोटक फलंदाज लियाम लिविंगस्टोन याने मागच्या काही दिवसांपासून फॉर्ममध्ये दिसला नव्हता. भारताविरुधच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतही तो अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतही त्याची बॅट शांत होती. मात्र, आता द हंड्रेड लीगच्या पहिल्याच सामन्यात त्याने तुफानी खेळी केली आणि फॉर्म पुन्हा मिळवल्याचे दिसले.
द हंड्रेड लीगच्या चालू हंगामातील चौथ्या सामन्यात लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) याने जबरदस्त फलंदाजीचे प्रदर्शन केले. हा सामना बर्मिंघम फिनिक्स आणि ट्रेंट रॉकेट्स या संघांमध्ये खेळला गेला. बर्मिंघमचे प्रतिनिधित्व करताना लिविंगस्टोनने ताबडतोड खेळी केली, मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. लिविंगस्टोनने या सामन्यात २८ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या धावा त्याने १ चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर केल्या.
अफगाणिस्तानचा दिग्गज फिरकीपटू राशिद खान (Rashid Khan) या सामन्यात लिविंगस्टोनच्या झंजावाताला बळी पडला. राशिदा खानच्या गोलंदाजीवर खेळताना कोणताही फलंदाजाला धावा करताना झगडतो, पण लिविंगस्टोन मात्र एका वेगळ्याच अंदाजात खेळताना दिसला. राशिदने टाकलेल्या ८२, ८३ आणि ८४ व्या चेंडूवर लिविंगस्टोनने लागोपाट तीन षटकार मारले आणि संघासाठी महत्वाच्या धावा केल्या.
English cricket fans are no strangers to @liaml4893 thrilling shots, and here 'The Beast' is treating the Birmingham crowd by hitting @rashidkhan_19 for 3 sixes!
Watch The Hundred LIVE, only on #FanCode 👉https://t.co/PiDRbo30mf@thehundred#TheHundred #TheHundredonFanCode pic.twitter.com/izHLzT74wI
— FanCode (@FanCode) August 6, 2022
डावातील ८२ व्या षटकात राशिदने डीप स्क्वेअर लेगच्या वरून षटकार मारला. त्यानंतर ८३ व्या चेंडू राशिदने पुन्हा शॉर्ट टाकला आणि लिविंगस्टोनने पुन्हा षटकार ठोकला. डावातील ८४ वा लिविंगस्टोनने एका गुडघ्यावर बसून मिड विकेटच्या वरून षटकारासाठी मारला. इंग्लंडच्या या दिग्गज फलंदाजीची फटकेबाजी पाहून चाहत्यांचेही चांगलेच मनोरंजन झाले.
लिविंगस्टोनच्या या वादळी खेळीच्या जोरावर बर्मिंघम संघा ७ विकेट्सच्या जोरावर १४३ धावा करू शकला. कर्णधार मोइन अली याने ३५ धावांची खेळी केली. ट्रेंट रॉकेट्ससाठी राशिद खान सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने टाकेलल्या २० चेंडूत ३९ धावा खर्च केल्या आणि एकही विकेट घेऊ शकला नाही. ट्रेंट रॉकेट्सचा सलामीवीर एलेक्स हेल्सने ४१ चेंडूत ५८ धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
कपिल देव यांनी सांगितले त्यांच्या फिटनेसचे रहस्य, युवा खेळाडूंनाही दिल्या टिप्स
‘आम्हाला संघात हे बदल करावे लागतील’, अंतिम सामन्यात पराभवानंतर कर्णधार हरमनप्रीतचे मोठे विधान
‘टी२० विश्वचषकात पराभवानंतर टीम इंडियाने काय बदल केले?’ आता खुद्द कॅप्टन रोहितनेच केले स्पष्ट