इग्लंडचा खेळाडू लियाम प्लंकेट त्याचा देश सोडणार आहे. तो आता भारतीय खेळाडूंसोबत एका नव्या संघासोबत त्याच्या नवीन कारकिर्दीची सुरुवात करणार आहे. देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम संपताच प्लंकेट सर्रे संघाला रामराम ठोकणार आहे. तो या हंगामानंतर अमेरिकेला जाणार आहे. तो तेथे मेजर क्रिकेट लिगमध्ये सहभाग घेऊ शकतो. या लीगमध्ये भारताचा माजी १९ वर्षाखालील संघाचा कर्णधार उन्मुक्त चंद आणि इतरही भारतीय खेळाडू दिसतील.
प्लंकेटची पत्नी इमेलेहा ही देखील मूळ अमेरिकेचीच आहे. २०१९ च्या विश्वचषक विजेत्या इंग्लंड संघाचा प्लंकेटही एक भाग राहिला आहे. तो २०१८ मध्ये याॅर्कशर संघातून सर्रे संघात गेला आणि तो या संघासोबत तीन वर्षे खेळला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत एकूण १२४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व केले आहे आणि यामध्ये त्याने २०१ विकेट्स मिळवल्या आहेत.
प्लंकेटने म्हटले की, “मी सर्रेच्या प्रत्येक सदस्याचे आभार मानतो, ज्यांनी मागच्या तीन वर्षांपासून मला सहकार्य केले. मी इंग्लंडसोबत अप्रतिम कारकिर्दीचा आनंद घेतला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मला अमेरिकेत खेळ आणि प्रशिक्षणला प्रोत्साहन देता येईल, यामुळे मला फार आनंद होत आहे.”
प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार प्लंकेट
प्लंकेट द फिलोहेल्कियंसमध्ये एका प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे. हा मायनर लीग क्रिकेटच्या पूर्व डिवीजनचा एक संघ आहे. प्लंकेट जरी आता अमेरिकेचा रहिवासी होणार असला तरी, तो इंग्लंडच्या स्थानिक स्वरूपातील २०२२ टी२० ब्लास्ट आणि द हंड्रेड क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहे. द हंड्रेड स्पर्धेच्या या वर्षीच्या हंगामात प्लंकेट द वेल्शफायर संघाकडून खेळला आहे.
द इंडिपेंडेंटला दिलेल्या एका मुलाखतीत प्लंकेटने ही गोष्ट स्पष्ट केली आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर यूएस संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पात्रता मिळाली, याबाबत तो विचार करणार नाही. त्याने असे सांगितले आहे की, “जर मी ते करण्याचा प्रयत्न केला तरी, मी आता ३६ वर्षांचा आहे आणि मी पात्र होईपर्यंत ३९ किंवा ४० वर्षांचा होईल. त्यामुळे याला काही अर्थ राहणार नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
द्रविडच्या शिष्याचे ओमानविरुद्ध दमदार शतक, दुसऱ्या वनडेत मुबंईचा २३१ धावांनी दणदणीत विजय
अरेरे! ‘या’ क्रिकेटरने मित्रासाठी तोडले बायो-बबलचे नियम, मग काय स्पर्धेतून झाली हकालपट्टी
नादच खुळा! दोन नव्या संघांच्या लिलावातून बीसीसीआयला मिळणार ‘एवढे’ रुपये