---Advertisement---

पठ्ठ्याने चक्क पंचांनाच दिली जीवे मारण्याची धमकी; आता भोगतोय परिणाम

On: शुक्रवार, डिसेंबर 17, 2021 1:51 PM
cricket umpires
---Advertisement---

क्रिकेट हा सभ्य लोकांचा खेळ आहे. या खेळात मैदानावर अनेक घटना घडत असतात. अनेकदा खेळाडूंमध्ये बाचाबाची झाल्याचे पहायला मिळत असते. तर अनेक खेळाडू एकमेकांची पायखेची करताना दिसून येत असतात. परंतु न्यूझीलंडमध्ये एक अशी धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे खेळाडूवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे.

न्यूझीलंडच्या गिसबोर्नमध्ये ४ डिसेंबर रोजी क्रिकेटचा सामना पार पडला होता. हा सामना झाल्यानंतर द पोवर्टी बे क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू टिमोटी वायरवर आजीवन बंदी घालण्यात आली. ही कारवाई करण्यामागचे कारण ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. या खेळाडूने पंचांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. जे क्रिकेट आचारसंहितेच्या लेव्हल ४ चे उल्लंघन आहे.

हायस्कूल ओल्ड बॉईज क्रिकेट क्लब विरुद्धचा सामना झाल्यानंतर, शेवटी टिमोथी वायरवर पंचांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर या आरोपावर कुठलीही सुनावणी झाली नव्हती. त्यानंतर समितीने चौकशी करून या प्रकरणावर सुनवाई केली आहे. त्यांनी त्यावर थेट आजीवन बंदी घालण्याची शिक्षा दिली आहे. लेव्हल ४ मध्ये खेळाडू दोषी आढळल्यानंतर, त्याला निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार नसतो. पोवर्टी बे क्रिकेट असोसिएशनने यापूर्वी २ वेळेस टिमोथी वायरला नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले होते.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निकाल लावण्यासाठी स्वतंत्र समिती निर्माण करण्यात आली होती. सर्व गोष्टींचा विचार करून या प्रकरणावर सुनावणी करण्यात आली आहे. न्यूझीलंड क्रिकेटचे मॅनेजर रिचर्ज बुक यांनी म्हटले की, “याबाबत बोर्ड अद्याप काहीही बोलण्याच्या स्थितीत नाहीये.” यापूर्वी सप्टेंबर महिन्यात एका क्रिकेटपटूवर त्याच्या दोन प्रतिस्पर्ध्यांवर अत्याचार केल्याप्रकरणी साडेतीन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. ही बंदी घालताना ओटागो क्रिकेट असोसिएशनने क्रिकेटपटू विल्यम जॉन कॅम्पबेलची कृती अत्यंत निषेधार्ह असल्याचे म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या – 

Video: ‘टीम इंडिया’ पोहोचली दक्षिण आफ्रिकेत; श्रेयसने धरला ताल तर विराट…

डी कॉक होणार बाबा! कसोटी मालिकेपूर्वी पत्नीसह घेतोय सुट्ट्यांचा आनंद

लखनऊ संघाच्या प्रशिक्षकपदाची रेस अखेरीकडे? ‘हा’ दिग्गज आघाडीवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---