14 डिसेंबर 2023ला सुरु झालेली ऑस्ट्रेलिया विरुद्द पाकिस्तानची 3 कसोटी सामन्यांची मालिका शनिवारी (6 जानेवारी) संपली. यामध्ये यजमान ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तानवर 3-0 ने विजय मिळवला. यामध्ये संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला मालिकावीर म्हणून घोषीत करण्यात आले.
पॅट कमिन्सने केली 2024 ची दमदार सुरवात
पॅट कमिन्ससाठी 2023 हे वर्ष खूप महत्वाच ठरल. यामध्ये त्याने त्याच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाला 2 आयसीसी ट्रॉफ्यांसोबतच काही महत्वाचे विजय मिळवून दिले. त्याचसोबत 2024 वर्षाची सुरुवात दमदार झाली. पर्थच्या मैदानावर खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाने 360 धावांनी विजय मिळवला. यानंतर मेलबर्न येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियाने 79 धावांनी विजय मिळवला. तीसऱ्या आणि अंतिम सामन्यातही ऑस्ट्रेलियाने 8 विकेट राखून सामन्याच्या चौथ्याच दिवशी विजय निश्चित केला.
कमिन्सच्या नावे सर्वाधीक विकेट.
कर्णधार कमिन्सने तीन कसोटी सामन्यांच्या या मालिकेत सर्वात जास्त 19 विकेट घेतल्या. यामध्ये 12.00 च्या सरासरीने त्याने या विकेट घेतल्या. या तिन्ही सामन्यांमध्ये कमिन्सला ‘फाईव्ह विकेट हॉल’ म्हणजेच विकेट्सचे पंचक घेता आले. यादरम्यान त्याची सरसारी 12.00 एवढी होती.
2023 मध्ये कमिन्सला मोठ यश
कमिन्ससाठी 2023 हे वर्ष खुप महत्वाच राहील. यात वर्षाच्या सुरवातीला त्याच्या नेतृत्वात संघाने अंतिम सामन्यात भारताचा 209 धावांनी पराभव करत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. ऑस्ट्रेलियासाठी हे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच पहिले जेतेपद ठरले. यानंतर कर्णधार कमिन्सने एशेज मालिका 2-2 ने बरोबरी करण्यात यश मिळवले. यानंतर एकदिवसीय विश्वचषकात यजमान भारताचा अंतिम सामन्यात पराभव करत विश्वचषक 2023 आपल्या नावे केला. वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलियाच्या या कर्णधावर आयपीयल 2024 साठी मोठी बोली लागली. सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला 20.50 कोटी रुपयाची ही बोली होती. आयपीयलच्या इतिहासात कमिन्स हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला. (Like last year, 2024 started off as a special one for Cummins, a ‘white wash’ for Pakistan.)
महत्वाच्या बातम्या –
AUS vs PAK । पाकिस्तान संघाचे विराटच्या पावलावर पाऊल! शेवटच्या कसोटीत वॉर्नरला खास भेट
David Warner: कारकिर्दीतील शेवटच्या कसोटी सामन्यानंतर वॉर्नर भावूक, ऍशेस आणि विश्वचषकाचा उल्लेख करत म्हणाला, ‘माझ्यासाठी हे स्वप्न…’