---Advertisement---

ट्रॉफीचे चुंबन आणि स्टेजवर डान्स; विश्वचषक जिंकल्यानंतर लिओनल मेस्सीने ‘असा’ केला जल्लोष

On: सोमवार, डिसेंबर 19, 2022 12:55 PM
Lionel Messi
---Advertisement---

लिओनल मेसीच्या नेतृत्वात रविवारी (18 डिसेंबर) अर्जेंटिना संघाने त्यांच्या इतिहासातील तिसरा फीफा विश्वचषक जिंकला. 35 वर्षीय लिओनल मेसी या सामन्यात मॅच विनरची भूमिका पार पाडू शकला. त्याने महत्वाचे दोन गोल केले आणि संघाला विजय मिळवून दिला. वियानंतर मेसी आणि अर्जेंटिना संघाने मनसोक्त जल्लोष केला. मेसी आणि त्याच्या कुटुंबाचे काही फोटे देखील सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत.

मर्यादित 90 मिनिटांमध्ये सामना 2-2 असा बरोबरीवर असल्यामुळे दोन्ही संघांना अतिरिक्त वेळ दिला गेला. अतिरिक्त वेळ मिळाल्यानंतर लिओनल मेस्सी (Lionel Messi) याने गोल करत संघाला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. पण एक्स्ट्रा टाईमधील सेकंड हाफमध्ये फ्रांसच्या एम्बाप्पेने गोल करत पुन्हा बरोबरी साधली. अखेर सामना निकाली काढण्यासाठी पंचांना पेनल्टी शूटआउटचा वापर करावा लागला. पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटिनाने सुरेख कामगिरी करत 4-2 असी कामगिरी केली आणि विश्वचषक जिंकला. विजयानंतरअर्जेंटिनाच्या ताफ्यात उत्साह आणि जल्लोषाचे वातावरण होते.

कर्णधार असल्याच्या नाते लिओनल मेस्सी याच्या हातात फीफाची ट्रॉफी दिली गेली. ट्रॉफी घेतल्यानंतर मेसी स्टेजवर आनंदाने थिरकू लागला. मेस्सीने सर्वात आधी ट्रॉफी उचलण्यापूर्वी तिचे चुंबन घेतले आणि नाचू लागला. मागच्या दोन दशकांपासून मेसी हे स्वप्न उराशी बाळगून होता, जे त्याने रविवारी फ्रांसला पराभूत करून पूर्ण केले. ट्रॉफी घेऊन जेव्हा मेसी स्टेजवर संघातील इतर सर्वांकडे गेला, तेव्हा सर्व खेळाडू एका ठेक्यात नाचताना दिसले. ट्रॉफी मेस्सीच्या हातात होती, पण सर्वच्या सर्व खेळाडू खूपच आनंदात होते.

हा जल्लोष संपल्यानंतर मेस्सी त्याच्या कुटुंबाजवळ गेला. मेस्सीची तिन्ही मुले आणि पत्नी अँटोनेला रोकुझो सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित होते. अँटोनेलाने तिच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून विश्वचषक ट्रॉफीसोबत फोटो शेअर केले आहेत. फोटोत मेस्सी आणि त्यांची मुलेही दिसत आहेत (Lionel Messi celebrates after winning the FIFA World Cup)

https://www.instagram.com/p/CmUpepQKKck/?utm_source=ig_web_copy_link

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्जेंटिनाच्या विश्वविजयाचे स्वप्न साकार करणारा मार्टिनेझ ठरला गोल्डन ग्लोव्हजचा मानकरी; अशी आहे आजवरची यादी 
फ्रान्सला मात देत अर्जेंटिना फुटबॉलचा नवा जगज्जेता! मेस्सीचे स्वप्न साकार 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---