लियोनल आंद्रेस मेस्सी आणि त्याचे विक्रम हे फुटबाॅल जगताला काही नविन नाहीत. आज त्यात अजुन एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. मेस्सी क्लब बार्सिलोना तर्फे आज आपला ६०० वा सामना खेळणार आहे.
बार्सिलोनासाठी सर्वाधिक सामने खेळलेल्या खेळाडूंमध्ये मेस्सीचा ३रा क्रमांक लागतो. सर्वाधिक ७६७ सामन्यांसह झावी १ तर ६४२ सामन्यांसह इनिएस्टा नंबर २ वर आहे. मेस्सी ५९९ सह ३ तर पुयोल ५९३ सामन्यांसह ४ नंबरला आहे.
मेस्सीच्या ५९९ सामन्यात बार्सिलोनाने ४२५ सामने जिंकले १०५ बरोबरित तर ६९ सामने गमावले आहेत. मेस्सीने बार्सिलोनासाठी ५९९ सामन्यात ५२३ गोल्स १९७ असिस्ट ३९ हॅटट्रिक्स आणि ३० ट्राॅफीझ मिळवल्या आहेत.
मेस्सीने ५९९ मधून कोणत्या लीगसाठी किती सामने खेळलेत ते खालील प्रमाणे:-
ला लीगा:- ३९२
चॅम्पियन्स लीग:- ११९
कोपा डेल रे:- ६२
स्पॅनिश सुपर कप:- १७
युरोपियन सुपर कप:- ०४
फीफा क्लब वर्ल्ड कर:- ०५
मेस्सीने कोणत्या मॅनेजर बरोबर किती सामने खेळलत ते खालील प्रमाणे:-
फ्राॅन्क रिजकार्ड:- ११०
पेप गार्डियलो:- २१९
टिटो विलानोवा:- ५०
जिरार्डो मार्टिनो:- ४६
लुईस एनरिक:- १५८
अर्नेस्टो वालवर्डे:- १६
मेस्सीने सर्वाधिक गोल्स केलेल्या संघांची यादी:-
१. सेविल्ला:- २९
२. ॲटलेटिको डी मॅद्रिद:- २७
३. रियल मद्रिद:- २४
४. वॅलेन्सिया:- २४
५. ॲथलेटिक क्लब:- २३
मेस्सीने बार्सिलोनासाठी ५२३ तर अर्जेंटीनासाठी ६१ गोल्स केले आहेत. तो केवळ १६ गोल्स दूर आहे आपल्या ६०० व्या सिनियर करियरच्या गोलपासून.
नचिकेत धारणकर
(टीम महा स्पोर्ट्स)