जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी बार्सिलोनासोबतचे २२ वर्षांचे संबंध संपवून फ्रान्समधील पॅरिस सेंट जर्मेन (पीएसजी) क्लबमध्ये सामील झाला आहे. त्यानंतर,अनेक पीएसजी चाहत्यांनी अर्जेंटिनाच्या या स्टार खेळाडूचे अभिनंदन आणि फ्रान्समध्ये स्वागत केले.
मेस्सी जेव्हा पीएसजी क्लबमध्ये सामील झाला तेव्हा हजारो चाहत्यांमध्ये काही भारतीय चाहते देखील होते, ज्यांना या फुटबॉल स्टारची झलक पाहायची होती. मेस्सी बाहेर येत असताना बाल्कनीतील भारतीय चाहत्यांनी मेस्सीच्या नावाचा उद्घोष केला. त्यानंतर, मेस्सीने त्यांचे अभिवादन स्वीकारले. मेस्सीने भारतीय चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
भारतीय चाहत्याने शेअर केला व्हिडिओ
मेस्सीचे आगमन झाल्यानंतर एक भारतीय चाहता मेस्सीचे नाव घेत ओरडत होता. त्याचवेळी मेस्सीने त्याचा हात हातात घेवून त्याचे अभिवादन स्वीकारले तेव्हा तो चकीत झाला. आनंदित चाहता या घटनेवर प्रतिक्रिया देत म्हणाला, “यावर माझा विश्वास बसत नाही. मुलांनो, फुटबॉलचा राजा बघा. मला यापेक्षा अधिक काही नको आहे.” असे म्हणत त्याने मेस्सीचे आभार मानले.
A Malayali’s ecstasy on having seen Lionel Messi on the balcony just beside his in Paris… pic.twitter.com/lb0oJF77Kb
— Ashlin Mathew (@ashlinpmathew) August 11, 2021
चॅपियन्स लीग जिंकण्याचा मेस्सीचा मनोदय
फ्रान्ससमधील सर्वात मोठी फुटबॉल लीग असलेल्या लीग १ या स्पर्धेमध्ये पीएसजी क्लब सहभागी होत असतो. संघाने तब्बल नऊ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. सध्या या संघामध्ये ब्राझीलचा स्ट्रायकर नेमार, अर्जेंटिनाचा एंजेल डी मारिया, स्पेनचा सर्जिओ रॅमोस, फ्रान्सचा किलीयन म्बापे व मागील महिन्यातच इटलीली युरो कप जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडलेला गोलरक्षक जियानलुची डोनारूमा हे प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय फुटबॉलर आहेत.
मेस्सीचा समावेश झाल्याने पीएसजी जगातील सर्वात मजबूत व्यवसायिक फुटबॉल क्लब बनल्याचे बोलले जातेय. पीएसजीशी करारबद्ध झाल्यानंतर मेस्सीने चॅम्पियन्स लीग जिंकण्याचा मनोदय बोलून दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या –
‘अरे भाऊ, मस्त!’, हार्दिकच्या नव्या लूकची सोशल मीडियावर चर्चा, पाहा फोटो
फाफ डू प्लेसिस ‘द हंड्रेड’मधून पडला बाहेर, नॉदर्न सुपरचार्जर्ससाठी लिहिली भावनिक पोस्ट
ऑक्टोबर महिन्यात इंग्लंड करणार ‘या’ देशाचा दौरा; टी२० विश्वचषकाची तयारी सुरू