अर्जेंटिना आणि फुटबॉल जगताला महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना यांचे निधन झाल्याने खूप मोठा धक्का बसला. मॅराडोना यांनी वयाच्या ६० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ते ब्रेन सर्जरी झाल्यानंतर घरी परतले होते. परंतु त्यांना बुधवारी (२५ नोव्हेंबर) हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर कोविड- १९ च्या परिस्थितीतही हजारोच्या संख्येने चाहत्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. यानंतर आता मॅराडोना यांच्याशी तुलना होणारा दिग्गज फुटबॉलपटू लियोनेल मेस्सी याने त्यांना खास अंदाजात श्रद्धांजली दिली आहे.
रविवारी (३० नोव्हेंबर) बार्सिलोनाने ओसासुनाविरुद्ध ४-०ने विजय मिळवला. या विजयादरम्यान मेस्सीने शेवटचा गोल केल्यानंतर जर्सी काढून मॅराडोना यांना श्रद्धांजली दिली.
मेस्सीने गोल केल्यानंतर बार्सिलोना संघाची जर्सी काढली. त्याने त्याच्या आतमध्ये मॅराडोना यांच्या नेवेल्स ओल्ड बॉईझ संघाची लाल आणि काळ्या रंगाची जर्सी घातली होती. यादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
https://twitter.com/MessiIizer/status/1333057144472612871
मेस्सी १३ वर्षांच्या वयात बार्सिलोना संघात सामील होण्यापूर्वी नेवेल्स संघाचा भाग होता.
मॅराडोना यांनी आपल्या शानदार कारकिर्दीच्या अंतिम काळादरम्यान १९९४ मध्ये नेवेल्स संघाकडून पाच सामने खेळले होते. मेस्सीने मॅराडोना यांच्या प्रशिक्षणाखाली २०१० साली अर्जेंटिनाकडून विश्वचषकही खेळला होता.






