---Advertisement---

मेस्सीच्या बार्सिलोना संघाच्या थरारक प्रदर्शनामुळे रोनाल्डोचा संघ चितपट, २ वर्षांनंतर घडलं ‘असं’

---Advertisement---

लियोनल मेस्सी आणि उस्मान डेंबेले यांच्या दमदार प्रदर्शनाच्या जोरावर गुरुवारी (२९ ऑक्टोबर) बार्सिलोना संघाने फुटबॉल चॅम्पियन्स लीगमध्ये जुवेंट्स संघाला २-०ने मात दिली. हा त्यांचा लीगमधील सलग दुसरा विजय होता. दर्शकांविना झालेल्या या सामन्यात जुेवेंट्सचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो अनुपस्थित होता.

कोरोना संक्रमित झाल्यामुळे नाही खेळला रोनाल्डो

चाहत्यांना गेल्या २ वर्षांपासुन रोनाल्डो आणि मेस्सी ही जोडी एकमेकांविरुद्ध खेळताना दिसलेली नाही. मात्र या सामन्यात तरी त्यांची इच्छा पूर्ण होईल अशी सर्वांना आशा होती. परंतु, रोनाल्डो काही दिवसांपुर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे अद्याप तरी तो सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे.

चॅम्पियन्स लीगच्या मागील २५ सामन्यांत बार्सिलोनाने जुवेंट्सला त्यांच्या मायदेशात पराभूत करण्याची ही दुसरी वेळ होती. यापुर्वी २०१८ साली बार्सिलोनाने जुवेंट्सला मायदेशात १-२ ने मात दिली होती.

बार्सिलोनाने जुवेंट्सला २-०ने केले चित

बार्सिलोनाचा फुटबॉलपटू डेंबेलेने १४व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाला आघाडीवर आणले होते. मेस्सीने (९० + १) पेनल्टीवर गोल करुन संघाची आघाडी आणखी मजबूत केली. हा सामना बार्सिलोनाने २-०च्या फरकाने जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या-

EPL: सोन-केनच्या जोडीची जबरा कामगिरी; नोंदवला हंगामातील नववा गोल

दिग्गज फुटबॉलपटूला कोरोनाची लागण; सोशल मीडियाद्वारे दिली माहिती

शेवटी ठरलं ! ‘या’ तारखेला होणारा आयएसएलचा शुभारंभ

शंभर वर्ष जुन्या क्लबने बदलले नाव आणि लोगो; ‘या’ नावाने सहभागी होणार आयएसएलमध्ये

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---