फिफा वर्ल्ड कपमध्ये लिओनेल मेस्सी याने घालेल्या सहा जर्सींचा लिलाव करण्यात आला आहे. लिलावात प्रत्येक जर्सीची बोली 10.5 कोटी रुपयांपर्यंत होती. मेस्सीच्या 6 जर्सी 64.75 कोटींना विकल्या गेल्या, तर मॅराडोनाची हॅण्ड ऑफ गॉड जर्सी 75.35 कोटींना विकली गेली होती.
अनेकदा खेळ आणि खेळाडूंशी संबंधित वस्तूंचे लिलाव होत असतात, ज्यामध्ये करोडो रुपयांच्या बोली लागतात. आता महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याच्या सहा जर्सींचा लिलाव करण्यात आला आहे, ज्या करोडो रुपयांना विकल्या गेल्या आहेत. न्यूयॉर्कमध्ये गुरुवारी (14 नोव्हेंबर) झालेल्या लिलावात या सहा जर्सी 7.8 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 64.75 कोटी रुपयांना विकल्या गेल्या. या सर्व जर्सी मेस्सीने फिफा विश्वचषक 2022 दरम्यान परिधान केल्या होत्या. आपल्या नेतृत्वाखाली अर्जेंटिनाला चॅम्पियन बनवणाऱ्या मेस्सीने या सहा जर्सी गट फेरीतील सामन्यांमध्ये घातल्या होत्या.
या वर्षातील हा सर्वात महागडा लिलाव ठरला असल्याचे लिलाव करणारी संस्था सोथबीजने म्हटले आहे. सोथबीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मेस्सी जर्सीच्या या सेटची किंमत त्याच्याशी संबंधित कोणत्याही लिलावाच्या किंमतीपेक्षा जास्त आहे.
यापूर्वी, मायकेल जॉर्डन ( Michael Jordan) याने 1998 मध्ये एनबीए फायनल्सच्या उद्घाटनाच्या सामन्यात घातलेली जर्सी आतापर्यंतची सर्वात महागडी स्पोर्ट्स जर्सी म्हणून विकत घेण्यात आली आहे, जी गेल्या वर्षी 10.1 दशलक्ष म्हणजेच 83.84 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती. (Lionel Messi’s 6 jerseys fetched Rs 65 crore at auction)
हेही वाचा
‘…म्हणून आम्ही तिला बेन स्टोक्स म्हणतो’, भारतीय महिला संघाच्या ‘या’ खेळाडूबद्दल प्रशिक्षकाचा मोठा खुलासा
धक्कादायक! रोहितला कर्णधारपदावरून हटवल्यामुळे चाहते Out of Control, जाळून टाकली मुंबईची टोपी अन् जर्सी- Video