भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आजपर्यंत ४१६ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. त्यात विराटने २४८ वनडे, ८६ कसोटी व ८२ टी२० सामने खेळले आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट ६वा आहे.
विराट कोहलीबरोबर एमएस धोनी (२८५), रोहित शर्मा (२७७), रविंद्र जडेजा (२३५), आर अश्विन (२२१), सुरेश रैना (२१३) तर शिखर धवन (२०५) सामने खेळले आहेत. या ६ खेळाडूंनी विराटसोबत २००पेक्षा अधिक सामने खेळण्याचा अजब पराक्रम केला आहे.
परंतु काही असेही खेळाडू आहेत जे याच भारताच्या कर्णधारासोबत जेमतेम १ किंवा २ सामने खेळले आहेत. विशेष म्हणजे आज त्यांचं नावही क्रिकेटप्रेमींना आठवत नाही. List of 5 rare Indian players whom with Virat Kohli played international cricket.
५. शाहबाज नदिम
झारखंडचा प्रतिभावान गोलंदाज शाहबाज नदिमने रांची कसोटीत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. त्याने खेळलेला हा एकमेव सामना. या सामन्यात ऑक्टोबर २०१९मध्ये खेळताना त्याने ४ विकेट्स घेतल्या होत्या. परंतु सध्या ३० वर्ष असलेल्या या खेळाडूला अजुनतरी पुन्हा सामना खेळायला मिळाला नाही. त्याने विराटबरोबर खेळलेला एकमेव आंतरराष्ट्रीय सामना.
४. पवन नेगी
दिल्लीचा अतिशय प्रतिभावान गोलंदाज पवन नेगीची अ दर्जाच्या सामन्यातील कामगिरी अतिशय चांगली आहे. त्याला आशिया कपमध्ये २०१६ रोजी त्याला भारत विरुद्ध युएई सामन्यात कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने १ विकेट घेतली होती. परंतु त्याला अजूनतरी पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यावेळी तो विराटबरोबर एकमेव आंतरराष्ट्रीय सामन्यात एकत्र खेळला.
३. श्रीनाथ अरविंद
कर्नाटकचा हा मध्यमगती गोलंदाज श्रीनाथ अरविंद आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत केवळ १ टी२० सामना खेळू शकला. त्यात त्याने १ विकेट घेतली होती. २ ऑक्टोबर २०१५ रोजी कर्णधार एमएस धोनीच्या नेतृत्त्वाखाली खेळताना त्याने धरमशाला येथे त्याने दक्षिण आफ्रिकासंघासोबत त्याने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. हाच त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. याच सामन्यात विराट कोहली त्याचा संघसहकारी होता. श्रीनाथ अरविंद विराटच्या नेतृत्त्वाखाली मात्र अनेक सामने बेंगलोरकडून आयपीएलमध्ये खेळला.
२. परवेज रसुल
जम्मू काश्मिर राज्यातील पहिला क्रिकेटपटू जो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला अशी ओळख असलेला परवेश रसुल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ १ वनडे व १ टी२० सामना खेळण्याची संधी मिळाली. २६ जानेवारी २०१७ रोजी कानपुर टी२०मध्ये त्याला संधी देण्यात आली होती. त्यात त्याने ५ धावा केल्या होत्या व १ विकेट घेतली होती. विराटबरोबर खेळलेला एकमेव आंततराष्ट्रीय सामना
१. अभिषेक नायर
मुंबई रणजी संघाचा एकेवेळचा महत्त्वाचा सदस्य व कर्णधार अभिषेक नायर कारकिर्दीत केवळ ३ वनडे सामने खेळला. ३ जुलै ते ३० सप्टेंबर २००९मध्ये तो हे तीन सामने खेळला. यातील ज्या शेवटच्या कारकिर्दीतील शेवटच्या सामन्यात नायर खेळला त्यात विराटने ७९ धावा केल्या होत्या. विराटच या सामन्यात सामनावीर ठरला होता. विराट व नायर एकत्र खेळलेले हा एकमेव आंतरराष्ट्रीय सामना.
ट्रेंडिंग घडामोडी –
–७ असे खेळाडू ज्यांच्याबरोबर रोहित खेळला आहे क्रिकेट, पण नाव कुणालाही नाही आठवत
ड्रीम ११: फक्त कन्यारत्नं असलेल्या भारतीय क्रिकेटपटूंची ड्रीम टीम इंडिया
भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांच्या मुलांची हटके नाव, जाणून घ्या काय आहेत…
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेले महाराष्ट्रीयन खेळाडू