२००७ साली पहिल्यांदा टी२० विश्वचषक खेळण्यात आला होता. यावेळी अंतिम सामन्यात ५ धावांनी पाकिस्तानला पराभूत करत भारताने इतिहास रचला होता. त्यानंतर २००९, २०१०, २०१२, २०१४ आणि २०१६मध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले. परंतु, भारत यापैकी कोणत्याही वर्षांत विश्वविजेता ठरु शकला नाही.
२००९, २०१० आणि २०१२मध्ये भारतीय संघ टी२० विश्वचषकाच्या सुपर ८च्या पुढे जाऊ शकला नाही. तर, २०१४मध्ये भारताने अंतिम सामना गाठला होता. परंतु, अंतिम सामन्यात श्रीलंकाने ६ विकेट्सने बाजी मारली आणि चषक पटकावला. त्यामुळे भारत विश्वचषक जिंकता-जिंकता राहिला.
२०१६मध्ये टी२० विश्वचषकाचे आयोजन भारतात करण्यात आले होते. यावेळी भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला होता. परंतु, वेस्ट इंडिजने ७ विकेट्सने तो सामना जिंकल्यामुळे भारत अंतिम सामन्यात पोहोचू शकला नाही आणि विश्वचषकातून बाहेर पडला.
आतापर्यंत झालेल्या ६ टी२० विश्वचषकांमध्ये एमएस धोनी हा भारतीय संघाचा कर्णधार होता. धोनीव्यतिरिक्त युवराज सिंग, रोहित शर्मा हे असे खेळाडू आहेत, जे सर्व टी२० विश्वचषकात भारतीय संघाचा भाग होते. तर, सुरेश रैना हा २००७ आणि हरभजन सिंग २०१४ ही वर्षे सोडून इतर ५ वर्षे भारतीय विश्वचषक संघाचा भाग होते.
जर, या ६ वर्षांतील टी२० विश्वचषकाची आकडेवारी पाहायची झाली तर, भारताचा कर्णधार विराट कोहली याने भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक ७७७ धावा केल्या आहेत. तर, ३३ षटकार मारत युवराज सिंग भारताकडून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. शिवाय, भारताकडून टी२० विश्वचषकात आर अश्विनने सर्वाधिक २० विकेट्स घेतल्या आहेत.
या लेखात ६ वर्षांतील भारतीय टी२० विश्वचषक संघातील सर्व खेळाडूंची यादी देण्यात आली आहे- List Of All Indian Players Which Were Part Of T20 World Cup
२००७ टी२० विश्वचषक –
एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), युवराज सिंग (उपकर्णधार), विरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा, गौतम गंभीर, जोगिंदर शर्मा, रॉबिन उथप्पा, दिनेश कार्तिक, आरपी सिंग, अजीत आगरकर, एस श्रीसंत, हरभजन सिंग, इरफान पठान, यूसुफ पठान, पीयूष चावला (एकही सामना खेळला नाही).
२००९ टी२० विश्वचषक –
एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), युवराज सिंग (उपकर्णधार), रोहित शर्मा, गौतम गंभीर, सुरेश रैना, यूसुफ पठान, इरफान पठान, आरपी सिंग, हरभजन सिंग, इशांत शर्मा, प्रज्ञान ओझा, दिनेश कार्तिक (एकही सामना खेळला नाही), प्रविण कुमार (एकही सामना खेळला नाही), रविंद्र जडेजा, झहीर खान.
२०१० टी२० विश्वचषक –
एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), युवराज सिंग, गौतम गंभीर, रोहित शर्मा, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, यूसुफ पठान, आशिष नेहरा, प्रविण कुमार (दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर), हरभजन सिंग, पीयूष चावला, विनय कुमार, मुरली विजय, झहीर खान, उमेश यादव (एकही सामना खेळला नाही ).
२०१२ टी२० विश्वचषक –
एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), गौतम गंभीर (उपकर्णधार), युवराज सिंग, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, मनोज तिवारी (एकही सामना खेळला नाही), हरभजन सिंग, आर अश्विन, पीयूष चावला, इरफान पठान, लक्ष्मिपती बालाजी, झहीर खान, अशोक दिंडा.
२०१४ टी२० विश्वचषक –
एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), युवराज सिंग, रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अमित मिश्रा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अजिंक्य रहाणे, वरुण अरॉन (एकही सामना खेळला नाही), स्टुअर्ट बिन्नी (एकही सामना खेळला नाही).
२०१६ टी२० विश्वचषक –
एमएस धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), युवराज सिंग (दुखापतीमुळे उपांत्य फेरीतून बाहेर), विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, हार्दिक पंड्या, आर अश्विन, रविंद्र जडेजा, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, पवन नेगी (एकही सामना खेळला नाही), हरभजन सिंग (एकही सामना खेळला नाही), मनिष पांडे.
ट्रेंडिंग लेख-
या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे ५ कर्णधार
हे ३ खेळाडू बनू शकतात आपल्याच आयपीएल संघाचे पुढील कर्णधार