भारताने आतापर्यंत २ वेळा म्हणजे १९८३ आणि २०११ला वनडे विश्वचषकावर आपले नाव कोरले होते. १९८३मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली आणि २०११मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताला हे ऐतिहासिक विजय मिळवण्यात यश आले होते. यांच्याव्यतिरिक्त भारताला असे अनेक कर्णधार लाभले आहेत. ज्यांनी भारतीय संघासाठी मोलाची कामगिरी केली आहे.
भारतीय संघाने १९७४मध्ये वनडे क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. यावेळी संघाचे कर्णधार अजित वाडेकर हे होते. त्यांच्यानंतर आतापर्यंत एकूण २३ क्रिकेटपटूंनी भारतीय वनडे संघाचे नेतृत्व केले आहे. इथे भारतीय संघांच्या आजर्यंतच्या वनडे कर्णधारांची संपूर्ण यादी देण्यात आली आहे.
तर जाणून घेऊयात, आजपर्यंतच्या भारतीय वनडे संघातील कर्णधारांची नावे आणि त्यांची आकडेवारी. List Of Indian ODI Captains.
१. एमएस धोनी (२००७-२०१६) – एकूण सामने- २००, विजयी- ११०, पराभूत- ७४, सरासरी- ५९.५२
२. मोहम्मद अझरुद्दीन (१९९०-१९९९) – एकूण सामने-१७४, विजयी- ९०, पराभूत- ७६, सरासरी- ५४.१६
३. सौरव गांगुली (१९९९-२००५) – एकूण सामने-१४६, विजयी- ७६, पराभूत- ६५, सरासरी- ५३.९०
४. विराट कोहली (२०१३-अजूनही कर्णधार) – एकूण सामने-८९, विजयी- ६२, पराभूत- २४, सरासरी- ७१.८३
५. राहुल द्रविड (२०००-२००७) – एकूण सामने-७९, विजयी- ४२, पराभूत- ३३, सरासरी- ५६.००
६. कपिल देव (१९८२-१९८७) – एकूण सामने- ७४, विजयी- ३९, पराभूत- ३३, सरासरी- ५४.१६
७. सचिन तेंडुलकर (१९९६-२०००) – एकूण सामने- ७३, विजयी- २३, पराभूत- ४३, सरासरी- ३५.०७
८. सुनील गावसकर (१९८०-१९८५) – एकूण सामने- ३७, विजयी- १४, पराभूत- २१, सरासरी- ४०
९. दिलीप वेंगसरकर (१९८७-१९८९) – एकूण सामने- १८, विजयी- ८, पराभूत- १०, सरासरी- ४४.४
१०. अजय जडेजा (१९९८-१९९९) – एकूण सामने- १३, विजयी- ८, पराभूत- ५, सरासरी- ६१.५३
११. कृष्णमचारी श्रीकांत (१९८९-१९८९) – एकूण सामने- १३, विजयी- ४, पराभूत- ८, सरासरी- ३३.३३
१२. विरेंद्र सेहवाग (२००३-२०१२) – एकूण सामने- १२, विजयी- ७, पराभूत- ५, सरासरी- ५८.३३
१३. सुरेश रैना (२०१०-२०१४) – एकूण सामने- १२, विजयी- ६, पराभूत- ५, सरासरी- ५४.५४
१४. रवि शास्त्री (१९८७-१९९१) – एकूण सामने- ११, विजयी- ४, पराभूत- ७, सरासरी- ३६.३६
१५. रोहित शर्मा (२०१७-२०१९) – एकूण सामने- १०, विजयी- ८, पराभूत- २, सरासरी- ८०.००
१६. श्रीनिवास वेंकटराघवन (१९७५-१९७९) – एकूण सामने- ७, विजयी- १, पराभूत- ६, सरासरी- १४.२८
१७. गौतम गंभीर (२०१०-२०११) – एकूण सामने- ६, विजयी- ६, पराभूत- ०, सरासरी- १००
१८. बिशन सिंग बेदी (१९७६-१९७८) – एकूण सामने- ४, विजयी- १, पराभूत- ३, सरासरी- २५.००
१९. अजिंक्य रहाणे (२०१५-२०१५) – एकूण सामने- ३, विजयी- ३, पराभूत- ०, सरासरी- १००
२०. अजित वाडेकर (१९७४-१९७४) – एकूण सामने- २, विजयी- ०, पराभूत- २, सरासरी- ००.००
२१. अनिल कुंबळे (२००२-२००२) – एकूण सामने- १, विजयी- १, पराभूत- ०, सरासरी- १००
२२. मोहिंदर अमरनाथ (१९८४-१९८४) – एकूण सामने- १, विजयी- ०, पराभूत- ०, सरासरी- ००.००
२३. सय्यद किरमानी (१९८३-१९८३) – एकूण सामने- १, विजयी- ०, पराभूत- १, सरासरी- ००.००
२४. गुंडप्पा विश्वनाथ (१९८१-१९८१) – एकूण सामने- १, विजयी- ०, पराभूत- ०, सरासरी- ००.००
ट्रेंडिंग लेख-
कसोटी सामन्यात दोन्ही डावात भोपळाही न फोडणारे १० खेळाडू
हे आहेत जगातील सध्याचे घडीचे ४ सर्वोत्तम गोलंदाज
एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत ७१० विकेट्स