भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी श्रीलंकेविरुद्धचा मोहाली कसोटी (Mohali Test) सामना अतिशय खास असणार आहे. कारण हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना (Virat Kohli’s 100th Test) असून हा एक विक्रम आहे. विराट हा भारताकडून १०० किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा १२ वा खेळाडू बनला आहे. परंतु रंजक बाब अशी की, भारताकडून १०० कसोटी सामने खेळणाऱ्या शेवटच्या ४ खेळाडूंवर नजर टाकायची झाल्यास, त्यातील २ खेळाडू विराटप्रमाणेच दिल्लीकर (100th Test Playing Delhiites)आहेत.
आपणा सर्वांना माहिती आहे की, ३३ वर्षीय विराटचा जन्म दिल्लीतला आहे. हाच दिल्लीकर विराट शुक्रवारी (४ मार्च) श्रीलंकेविरुद्ध आपल्या १०० वा कसोटी सामन्यासाठी मोहालीच्या मैदानावर उतरला आहे. विराटपूर्वी भारताकडून १०० कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम करणारे शेवटचे ३ खेळाडू म्हणजे, विरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि इशांत शर्मा. या तिघांपैकी फिरकी गोलंदाज हरभजनला वगळता विस्फोटक सलामीवीर सेहवाग आणि वेगवान गोलंदाज इशांत हे दोघेही विराटप्रमाणेच दिल्लीतून आलेले खेळाडू आहेत.
सेहवागने त्याच्या संपूर्ण कसोटी कारकिर्दीदरम्यान १०४ सामने खेळले. या १०४ सामन्यांमध्ये ४९.३४ च्या सरासरीने फलंदाजी करताना त्याने ८५८६ धावा केल्या होत्या. तर इशांतने आतापर्यंत भारताकडून १०५ कसोटी सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने ३११ विकेट्स घेतल्या आहेत.
हेही वाचा- शंभराव्या कसोटीनिमित्त विराट कोहलीचा प्रशिक्षक द्रविडकडून सन्मान, अनुष्काही होती उपस्थित
कोणत्या देशाकडून किती खेळाडूंनी खेळलेत १०० कसोटी सामने?
दरम्यान विराट हा भारताकडून १०० किंवा त्यापेक्षा जास्त कसोटी सामने खेळणारा १२ वा खेळाडू बनला आहे. यासह भारतीय संघ हा सर्वाधिक १०० कसोटी सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. याबाबतीत इंग्लंड संघ अव्वलस्थानी आहे. ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत १५ खेळाडूंनी १०० किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळले आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघाकडून १३ खेळाडूंनी १०० कसोटी सामने खेळले असून हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या संघांना वगळता इतर कोणत्याही संघांचे १० खेळाडूही आतापर्यंत १०० सामन्यांचा आकडा गाठू शकलेले नाहीत. वेस्ट इंडिज (०८ खेळाडू), दक्षिण आफ्रिका (०८ खेळाडू), श्रीलंका (०६ खेळाडू), नेदरलँड (०४ खेळाडू), पाकिस्तान (५ खेळाडू) या संघांकडून ४ किंवा त्याहून जास्त खेळाडूंनी कसोटी सामन्यांचे शतक पूर्ण केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
शंभराव्या कसोटीनिमित्त विराट कोहलीचा प्रशिक्षक द्रविडकडून सन्मान, अनुष्काही होती उपस्थित
Video: एस श्रीसंतला तब्बल ९ वर्षांनंतर मिळाली रणजी विकेट, भावूक होऊन खेळपट्टीवर घातले लोटांगण
मोठी बातमी! ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक काळाच्या पडद्याआड, यष्टीमागे घेतलेल्या ४३९ विकेट्स