सनरायझर्स हैद्राबादने आज आपला नवा कर्णधार म्हणून केन विलीयमसनची नियुक्ती केली आहे. तो आयपीएलच्या ११व्या मोसमात ही जबाबदारी पार पाडेल.
चेंडू छेडछाड प्रकरणानंतर काल डेव्हिड वॉर्नरने हैद्राबाद संघाचे कर्णधारपद सोडले होते तर हे प्रकरण घडले तेव्हा प्रकरणानंतर स्मिथने लगेचच राजस्थान संघाचे कर्णधारपद सोडले होते.
यामुळे राजस्थानने आपल्या कर्णधाराचे नाव काही दिवसांपुर्वी घोषीत केले. तर आज सनरायझर्स हैद्राबादने आपला नवा कर्णधार म्हणून केन विलीयमसन घोषीत केला.
कालपर्यंत हैद्राबाद संघाने नवीन कर्णधाराची कोणतीही घोषणा केलेली नव्हती. त्यामुळे हैद्राबादच्या नेतृत्वाच्या शर्यतीत भारतीय सलामीवीर शिखर धवन आणि न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियम्सन यांची नावे आघाडीवर होती.
शिखर या संघाचा कर्णधार झाला असता तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच सर्व संघांचे कर्णधार भारतीय झाले असते.
7 एप्रिल पासून आयपीएलच्या सामन्यांना सुरूवात होत आहे. पहिला सामना मुबंई इंडीयन्स विरूद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे.
आयपीएल संघ आणि कर्णधार
1) मुबंई इंडीयन्स – रोहीत शर्मा
2) चेन्नई सुपरकिंग्ज – एमएस धोनी
3) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – विराट कोहली
4) राजस्थान रॉयल – अजिंक्य रहाणे
5) कलकत्ता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक
6) किंग्ज इलेवन पंजाब – आर अश्विन
7) दिल्ली डेयरडेविल्स – गौतम गंभीर
8) सनरायजर्स हैजराबाद –केन विलीयमसन