मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ५१ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झाला. हा सामना मुंबई इंडियन्सने ५ धावांनी जिंकला. दरम्यान, या सामन्यात गुजरात टायटन्सचा युवा फलंदाज साई सुदर्शन याच्या विकेटने सर्वांचेच लक्ष वेधले. तो या सामन्यात हिट विकेटमुळे बाद झाला.
असा झाला साई सुदर्शन हिट विकेट
या सामन्यात मुंबईने १७८ धावांचे आव्हान गुजरातला दिले होते. यावेळी १६ व्या षटकात साई सुदर्शन (Sai Sudharsan) आणि हार्दिक पंड्या गुजरातकडून फलंदाजी करत होता. तसेच कायरन पोलार्ड गोलंदाजी करत होता. या षटकात दुसऱ्या चेंडूवर सुदर्शनने षटकार खेचला होता. पण त्यानंतर पुढच्या तीन चेंडूत पोलार्डने दोन धावाच दिल्या. अखेरच्या चेंडूवर सुदर्शनला मोठा फटका खेळायचा होता. पण पोलार्डने टाकलेल्या स्लो बाऊंसरवर फटका खेळताना त्याचा तोल गेला आणि बॅट स्टम्पवर आदळली. त्यामुळे साई सुदर्शन ११ चेंडूत १४ धावा करून बाद झाला.
तो आयपीएल २०२२ मध्ये (IPL 2022) हिट विकेट (Hit Wicket in IPL) होणारा पहिला खेळाडू ठरला आहे. तसेच आयपीएलच्या इतिहासात हिट विकेट होणारा १३ वा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी १२ खेळाडू आयपीएलमध्ये हिटविकेट झाले आहेत.
आयपीएलमध्ये हिट विकेट होणारे खेळाडू
१. मुसावीर खोटे (मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स, २००८
२. मिस्बाह-उल-हक (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध पंजाब किंग्स, २००८)
३. स्वप्निल अस्नोडकर (राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, २००९)
४. रविंद्र जडेजा (चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध डेक्कन चार्जर्स, २०१२)
५. सौरभ तिवारी (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१२)
६. युवराज सिंग (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१६)
७. दीपक हुडा (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, २०१६)
८. डेव्हिड वॉर्नर (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स, २०१६)
९. शेल्डन जॅक्सन (कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रायझिंग पुणे सुपर जायंट्स, २०१७)
१०. रियान पराग (राजस्थान रॉयल्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०१९)
११. हार्दिक पंड्या (मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, २०२०)
१२. जॉनी बेअरस्टो (सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२१)
१३. साई सुदर्शन (गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२२)
मुंबईचा रोमांचक विजय
या सामन्यात (Gujarat Titans vs Mumbai Indians) मुंबई दिलेल्या १७८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातकडून वृद्धिमान साहा (५५) आणि शुबमन गिल (५२) यांनी अर्धशतके झळकावत आणि सलामीला १०६ धावांची भागीदारी करून चांगली सुरुवात केली होती. मात्र, नंतर गुजरातच्या अन्य फलंदाजांना खास काही करता आले नाही.
साई सुदर्शन बाद झाल्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्यादेखील १८ व्या षटकात २४ धावांवर बाद झाला. तर डेव्हिड मिलरलाही खास काही करता आले नाही. तो १४ चेंडूत १९ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे गुजरातला २० षटकात ५ बाद १७२ धावाच करता आल्या. अखेरच्या षटकात मुंबईकडून डॅनियल सॅम्सने (Daniel Sams) गोलंदाजी करताना ९ धावांचे यशस्वी रक्षण केले. त्याने या षटकात केवळ ३ धावाच दिल्या.
तत्पूर्वी, मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७७ धावा केल्या. मुंबईकडून इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी सलामीला ७४ धावांची भागीदारी करत मुंबईला चांगली सुरुवात मिळवून दिली. इशानने मुंबईकडून सर्वाधिक ४५ धावा केल्या. तसेच रोहितने (Rohit Sharma) ४३ धावांची खेळी केली. त्यांच्यानंतर टीम डेव्हिडने आक्रमक खेळ करत २१ चेंडूत २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ४४ धावा ठोकल्या. गुजरातकडून राशिद खानने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटमध्ये कसा करण्यात येतो खेळपट्टी झाकण्यासाठी कव्हर्सचा उपयोग, जाणून घ्या काय आहेत नियम
आरारा खतरनाक! मुंबईने अव्वल क्रमांकावरील गुजरातला हरवल्यावर सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट
IPL | अटीतटीच्या लढतीत मुंबईच सर्वांना वरचढ! ‘इतक्यांदा’ मिळवला ५ पेक्षा कमी धावांनी विजय