आयपीएल 2021ला काही दिवसातच सुरूवात होणार आहे. यावेळी संपूर्ण आयपीएल सामने 9 एप्रिल ते 30 मे दरम्यान भारतात खेळले जातील. नेहमीप्रमाणे यावेळेसदेखील ‘ऑरेंज कॅप’साठी सर्वच क्रिकेटपटूंमध्ये शर्यत दिसणार आहे. पण आयपीएलमध्ये आतापर्यंत कोणत्या क्रिकेटपटूने सर्वाधिक षटकार मारले आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर मग आज आपण आयपीएलमधील सर्वाधिक षटकार मारणार्या क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेऊया…
ख्रिस गेल – या यादीमध्ये प्रथम नाव येते ते ख्रिस गेलचे. सर्वात जास्त षटकार मारण्याचा विषय आणि त्यात ख्रिस गेलचे नाव नाही असे कधी होणारच नाही. या यादीत गेल पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने आयपीएलच्या 132 सामन्यात 349 षटकार लगावले आहेत. तर आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 4772 धावा केल्या आहेत.
एबी डिविलियर्स – एबी डिविलियर्स हा या यादीमध्ये दुसर्या क्रमांकावर आहे. ‘मिस्टर 360’ म्हणून ओळखला जाणारा एबी हा सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 169 सामने खेळताना 235 षटकार ठोकले आहेत. त्याची एकूण धावसंख्या 4849 आहे.
एमएस धोनी – ‘हेलिकॉप्टर शॉट’साठी प्रसिद्ध असलेला चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी तिसर्या क्रमांकावर आहे. त्याने 204 सामन्यांत एकूण 216 षटकार ठोकले आहेत. या यादीत दुसर्या क्रमांकावर जाण्यासाठी तो फक्त 19 षटकार दूर आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत 4632 धावा केल्या आहेत.
रोहित शर्मा – चौथ्या क्रमांकावर येतो मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा. त्याने 200 सामन्यात 213 षटकार ठोकले आहेत. तर आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याने 5230 धावा केल्या आहेत आणि 5 वेळा त्याने आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद देखील मिळवून दिले आहे.
विराट कोहली – या यादीत विराट कोहली पाचव्या क्रमांकावर आहे. बंगळुरू संघाचा कर्णधार आणि स्टार खेळाडू विराट कोहलीने आतापर्यंत आयपीएलच्या 192 सामन्यांमध्ये 201 षटकार ठोकले आहेत. तर त्याने या सर्व खेळाडूंमध्ये सर्वाधिक 5412 धावा केल्या आहेत.
कायरन पोलार्ड – मैदानावर जाऊन चौफेर फटकेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला कायरन पोलार्ड सहाव्या क्रमांकावर आहे. मुंबई इंडियन्सच्या या शिलेदाराने 164 सामने खेळताना 198 षटकार मारले आहेत. यासह त्याने 3023 धावांची खात्यात नोंद केली आहे.
डेविड वॉर्नर – या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहे डेविड वॉर्नर. सनरायझर्स हैदराबाद संघाचा कर्णधार असलेल्या वॉर्नरने 142 सामन्यात 195 षटकार ठोकले आहेत आणि 5254 धावा केल्या आहेत.
सुरेश रैना – या यादीत सुरेश रैनाचा आठवा क्रमांक लागतो. त्याने आतापर्यंत 130 सामन्यात 194 षटकार ठोकले आहेत. आयपीएलमध्ये त्याने एकूण 5368 धावा केल्या आहेत. विराट कोहलीनंतर सर्वाधिक धावा करण्यात रैनाचा क्रमांक लागतो. आयपीएलच्या 13 व्या सत्रात तो खेळला नव्हता.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटचा भिडू मैदान मारणार! फ्लडलाईटपेक्षाही उंचावर मारला ‘खणखणीत सिक्सर’, चेंडू स्टेडियमच्या छतावर
यंदा पंजाब किंग्जचं बदलणार नशीब! ‘हा’ धुरंधर नेटमध्ये मारतोय गगनचुंबी षटकार, व्हिडिओ व्हायरल