इंडियन प्रीमियर लीग २०२१ चा (आयपीएल) शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) समारोप झाला आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात दुबईच्या मैदानावर ही लढत रंगली होती. प्रथम फलंदाजी त्यानंतर गोलंदाजीत अप्रतिम खेळ दाखवत चेन्नईने कोलकाताला २७ धावांनी धूळ चारली आणि चौथ्यांदा आयपीएल चषक उंचावला आहे. या पराभवामुळे कोलकाता संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.
पहिल्या टप्प्यातील असमाधानकारक प्रदर्शनानंतर इयॉन मॉर्गनच्या नेतृत्त्वाखालील कोलकाता संघाने दुसऱ्या टप्प्यात शानदार पुनरागमन केले होते. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, दिल्ली कॅपिटल्स अशा मोठमोठ्या संघांना पराभूत करत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. साखळी फेरीनंतर त्यांनी प्लेऑफ सामन्यांमध्येही त्यांचे मॅच विनिंग प्रदर्शन सुरूच ठेवले होते.
सुरुवातीला एलिमिनेटर सामन्यात बेंगलोरला ४ विकेट्सने चितपट करत त्यांनी दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्या क्वालिफायरमध्येही दिल्ली कॅपिटल्स ३ विकेट्सने विजय मिळवत त्यांनी अंतिम सामना गाठला होता. परंतु अंतिम सामन्यात त्यांना गोलंदाजी आणि फलंदाजीत विशेष प्रदर्शन करता आले नाही. परिणामी जेतेपदाच्या अगदी जवळ पोहोचूनही मॉर्गनच्या कोलकात्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
मॉर्गनपूर्वीही अंतिम सामन्यात बऱ्याचशा कर्णधारांच्या हाती निराशा आलेली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, आयपीएलचा दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनीचेच सर्वाधिक वेळा हृदय तुटले आहे. ४ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीचा अंतिम सामन्यात तब्बल ६ वेळा पराभव झाला आहे. वर्ष २००८, २०१०, २०१२, २०१३, २०१५ आणि २०१९ मध्ये धोनी आपल्या चेन्नई संघाच्या पारड्यात जेतेपद टाकू शकलेला नाही.
आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील उपविजेते कर्णधार
२००८- एमएस धोनी
२००९- अनिल कुंबळे
२०१०- एमएस धोनी
२०११- डॅनियल व्हिटोरी
२०१२- एमएस धोनी
२०१३- एमएस धोनी
२०१४- जॉर्ज बेले
२०१५- एमएस धोनी
२०१६- विराट कोहली
२०१७- स्टिव्ह स्मिथ
२०१८- केन विलियम्सन
२०१९- एमएस धोनी
२०२०- श्रेयस अय्यर
२०२१- इयॉन मॉर्गन
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल निवृत्तीच्या प्रश्नावर थाला स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘मी अजूनही सीएसके सोडलेली…’
सीएसकेने चषक उंचावताच साक्षी आणि झिवाची धोनीला कडकडून मिठी, चाहत्यांचेही मन आले भरुन
आता धोनीच म्हणतोय, “केकेआर विजयाचा हकदार होता”; दिले ‘हे’ कारण





