---Advertisement---

५.६ कोटी लोकसंख्येच्या इंग्लंडमधून आजवर तब्बल ‘७००’ कसोटीपटू, पण १४० कोटी भारतीयांपैकी किती? घ्या जाणून

On: शुक्रवार, जानेवारी 14, 2022 3:50 PM
Team-India
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड (SA vs ENG) यांच्यात सुरू असलेली ऍशेस मालिका (Ashes Series) अखेरीस आली आहे. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना होबार्ट येथे १४ जानेवारीपासून खेळला जात आहे. या सामन्यातून इंग्लंडचा यष्टीरक्षक सॅम बिलिंग्स (Sam Billings) याचे कसोटी संघात पदार्पण झाले आहे. यासह तो इंग्लंडकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा ७०० वा खेळाडू (700 th England Player) ठरला आहे.

इंग्लंडचे यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर आणि जॉनी बेयरस्टो हे दुखापतीमुळे पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर आहेत. याच कारणास्तव बिलिंग्सला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. आंतरराष्ट्रीय पदार्पणानंतर कसोटी स्वरुपात पदार्पण करण्यासाठी त्याला जवळपास ७ वर्षे वाट पाहावी लागली आहे.

दरम्यान, जर इंग्लंडकडून आतापर्यंत खेळलेल्या कसोटीवीरांच्या संख्येची भारतीय कसोटीपटूंच्या संख्येशी तुलना करायची झाल्यास, ती अर्ध्यापेक्षाही कमी आहे. ५.६ कोटी लोकसंख्येच्या इंग्लंडमध्ये १८७७ पासून कसोटी क्रिकेटची सुरुवात झाली. तेव्हापासून ते आजवर इंग्लंडकडून ७०० खेळाडू कसोटी क्रिकेट खेळले आहेत. पण १४० कोटी लोकसंख्या असलेल्या भारतात मात्र १९३२ पासून फक्त ३०३ खेळाडू कसोटीवीर म्हणून कसोटी खेळले आहेत. अशाप्रकारे इंग्लंडच्या ७०० कसोटीपटूंच्या तुलनेत भारताकडून निम्म्यापेक्षाही कमी म्हणजे केवळ ३०३ खेळाडूंनी कसोटी सामने खेळले आहेत. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कसोटी, या सर्वात जुन्या स्वरुपात इंग्लंडकडून सर्वाधिक खेळाडू खेळले आहेत. तर आयर्लंड या संघाकडून सर्वात कमी म्हणजे केवळ १७ खेळाडूंचं कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. तर मग, आजवर कोणत्या देशांकडून किती खेळाडू कसोटी खेळलेत हे पाहूया-

कोणत्या देशाकडून किती खेळाडूंनी कसोटी सामने खेळलेत याची यादी (List Of Test Players Number Of Each Country)-
इंग्लंड- ७०० खेळाडू
ऑस्ट्रेलिया- ४६३ खेळाडू
दक्षिण आफ्रिका- ३४९ खेळाडू
वेस्ट इंडिज- ३२७ खेळाडू
भारत- ३०३ खेळाडू
न्यूझीलंड- २८२ खेळाडू
पाकिस्तान-२४६ खेळाडू
श्रीलंका- १५७ खेळाडू
झिम्बाब्वे- १२० खेळाडू
बांगलादेश- १०० खेळाडू
अफगाणिस्तान- २४ खेळाडू
आयर्लंड- १७ खेळाडू

महत्त्वाच्या बातम्या-

“तेरा वर्षांपासून बडबड सुरु आहे, तू मला शांत ठेवशील का?” विराट-एल्गर यांच्यात रंगला शाब्दिक वाद

विराटच्या ‘त्या’ वर्तनावर भडकला गंभीर! ‘…तुम्ही कधीच रोल मॉडेल बनू शकत नाही’

इंग्लंडकडून पदार्पण करणारा ६९९ वा खेळाडू असूनही बिलिंग्सला मिळाली ७०० क्रमांकाची कॅप, वाचा त्यामागची ईनसाईड स्टोरी

हेही वाचा- 

क्रिकेट अंपायर्सला मिळणारे मानधन| Cricket Umpire Salary

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---