---Advertisement---

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे टॉप 5 खेळाडू कोण? पाहा संपूर्ण यादी!

On: रविवार, जुलै 13, 2025 8:00 PM
---Advertisement---

Top 5 players who took catches in Test cricket: कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजी जितकी महत्त्वाची असते, तितकीच क्षेत्ररक्षणाची भूमिकाही मोठी असते. खासकरून जेव्हा झेलचा विषय येतो, तेव्हा अनेकदा एक झेल संपूर्ण सामन्याचे चित्र बदलू शकतो. अशाच क्षेत्ररक्षणातील माहीर खेळाडूंची चर्चा करायची झाल्यास, इंग्लंडचा स्टार फलंदाज जो रूट आता या यादीत सर्वात वरच्या स्थानावर पोहोचला आहे. चला तर मग या बातमीद्वारे आपण कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक झेल घेणारे टाॅप-5 खेळाडू कोण आहेत, याबाबत जाणून घेऊयात. (Most catches in Test cricket)

1) जो रूट (इंग्लंड)- लॉर्ड्समध्ये भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीदरम्यान करुण नायरचा एका हाताने अप्रतिम झेल पकडताच जो रूटने नवा रेकाॅर्ड केला. त्याच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 211 झेल झाले आहेत. त्याने हा पराक्रम 156 कसोटी सामन्यांमध्ये केला आहे. त्याचा प्रति डाव झेल घेण्याची सरासरी 0.72 आहे आणि एका डावात 4 झेल घेण्याचा रेकाॅर्डही त्याच्या नावावर आहे. (Joe Root Test catches record)

2) राहुल द्रविड (भारत)- भारतीय संघात ‘द वॉल’ म्हणून ओळखले जाणारे राहुल द्रविड या यादीत बऱ्याच काळापासून नंबर 1 होते, परंतु अलीकडेच रूटने त्यांच्याकडून हा रेकाॅर्ड आपल्या नावावर केला आहे. द्रविडने 164 कसोटी सामन्यांमध्ये 210 झेल पकडले आहेत. त्यांचा प्रति डाव झेल घेण्याची सरासरी 0.697 आहे आणि त्यांनी एका डावात जास्तीत जास्त 3 झेल पकडले आहेत. द्रविडने 1996 मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि 2012 मध्ये निवृत्ती घेतली. (Rahul Dravid Test catches record)

3) महेला जयवर्धने (श्रीलंका)- श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज महेला जयवर्धने या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्याने 149 कसोटी सामन्यांमध्ये 205 झेल पकडले आहेत. त्याचा प्रति डाव झेल घेण्याची सरासरी 0.759 होती. विशेषतः स्लिपमध्ये त्याचे रिफ्लेक्सेस अत्यंत जलद होते. त्याने 1997 मध्ये पदार्पण केले आणि 2014 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. (Mahela Jayawardene Test catches record)

4) स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया)- ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथने आतापर्यंत 118 कसोटी सामन्यांमध्ये 200 झेल घेतले आहेत. त्याची सरासरी 0.888 झेल प्रति डाव आहे आणि एका डावात 5 झेल घेण्याचा रेकाॅर्डही त्याच्याकडे आहे. 2010 मध्ये कसोटी पदार्पण करणारा स्मिथ अजूनही ऑस्ट्रेलियन संघाचा महत्त्वाचा भाग आहे आणि या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. (Steve Smith Test catches record)

5) जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका)- दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने 166 कसोटी सामने खेळले असून त्यात 200 झेल घेतले आहेत. त्याचा प्रति डाव झेल घेण्याची सरासरी 0.634 होती. 1995 ते 2013 पर्यंत चाललेल्या कारकिर्दीत कॅलिसने फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही आपली छाप सोडली आहे. (Jacques Kallis Test catches record)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---