भारत आणि बांगलादेश संघ शुक्रवारी (15 सप्टेंबर) वनडे सामन्यात आमने सामने होते. आशिया चषक 2023च्या आशिया चषकातील हा शेवटचा सुपर पोर सामना होता. भारत आणि श्रीलंका संघ आशिया चषकाचा अंतिम सामना खेळणार, हे आधीच निश्चित झाल्यामुळे शुक्रवारच्या या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्वाचे बदल पाहयला मिळाले. मोहम्मद सिराज याच्या जागी मोहम्मद शमीला संधी दिली गेली. शमीनेही एक जबरदस्त विकेट घेत आपली संघातील दावेदारी भक्कम केली.
मोहम्मद शमी (Mohammed Shami) भारतीय संघाचा दिग्गज गोलंदाज आहे. मात्र, मागच्या मोठ्या काळापासून वेगवान गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अपेक्षित संधी मिळाली नाहीये. आशिया चषकातही त्याने आतापर्यंत फक्त एकाच सामन्यात गोलंदाजी केली. नेपाळविरुद्धच्या या सामन्यात त्याने एक विकेट घेतली होती. त्यानंतर शमी थेट बांगलादेशविरुद्ध खेळला. त्याने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतासाठी गोलंदाजीची सुरुवात केली.
पहिल्या षटकात त्याला विकेट मिळाली नाही. पण आपल्या कोट्यातील दुसऱ्या आणि बांगलादेशच्या डावातील तिसऱ्या षटकात पहिल्याच चेंडूवर शमीला यश मिळाले. शमीच्या जबरदस्त इनस्विंग चेंडू टाकून सलामीला आलेला यष्टीरक्षक फलंदाज लिटन दास (Litton Das) याची विकेट घेतली. या विकेटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचा चर्चेत आहे. एका चाहत्याने अशी कमेंट देखील केली आहे की, “शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित स्थान मिळाले पाहिजे.” (Liton Das was clean bowled by an excellent inswing ball from Moahammad Shami)
WHAT A BALL, SHAMI ????pic.twitter.com/X8elBBTfQg
— Johns. (@CricCrazyJohns) September 15, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश – लिटन दास (यष्टीरक्षक), तंजीद हसन, अनमूल हक, शाकिब अल हसन (कर्णधार), तौहीद ह्रदोय, शमीम हुसेन, मेहिदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तंजीम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान.
महत्वाच्या बातम्या –
संघ व्यवस्थापनाकडून विराटकडे वॉटरबॉयची जबाबदारी, माजी कर्णधाराची अवस्था पाहून चाहते नाराज
आनंदाची बातमी! ग्लेन मॅक्सवेल बनला बापमाणूस, पत्नी विनीने दिला मुलाला जन्म, नाव काय ठेवलंय माहितीये?






