टी20 विश्वचषक 2022मधील 35वा सामना भारत विरुद्ध बांगलादेश संघात ऍडलेड येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाच्या दोन फलंदाजांनी अफलातून फटकेबाजी करत अर्धशतक साकारले, आणि समाधानकारक धावसंख्या उभारली. मात्र, या सर्वांमध्ये आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाच्या सलामीवीराने इतिहासच रचला. सलामीवीर लिटन दास याने अर्धशतक झळकावत भारताविरुद्ध आतापर्यंत बांगलादेशच्या कुठल्याही फलंदाजाला न जमलेला विक्रम करून दाखवला.
या सामन्यात बांगलादेश (Bangladesh) संघाचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 184 धावांचा डोंगर उभारला. भारताला हा डोंगर उभा करण्यात केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांचेही अर्धशतक फायद्याचे ठरले. मात्र, 185 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशच्या सलामीवीरांनी शानदार सुरुवात केली.
भारताविरुद्ध वेगवान अर्धशतक करणारा खेळाडू
झाले असे की, बांगलादेश संघाचा सलामीवीर लिटन दास (Litton Das) याने यावेळी फलंदाजी करताना अवघ्या 21 चेंडूत 3 चोकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 51 धावा चोपत अर्धशतक झळकावले. हे अर्धशतक साकारत त्याच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. तो भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करणारा बांगलादेशचा फलंदाज बनला. त्यासोबतच तो टी20 विश्वचषकाच्या इतिहासात बांगलादेशकडून सर्वाधिक वेगवान अर्धशतक साकारणारा दुसरा फलंदाज बनला. (Litton Das scored 50 in 21 balls which is the fastest 50 against India and 2nd fastest for Bangladesh in the T20 World Cup history.)
Litton Das brings up his fifty off just 21 balls! 🤯#T20WorldCup | #INDvBAN | 📝: https://t.co/vDRjKeeGvf pic.twitter.com/sPM4wU5vch
— ICC (@ICC) November 2, 2022
सामन्यात पावसाचा व्यत्यय
हा विक्रम केल्यानंतर तो या सामन्यात 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 59 धावांवर खेळत होता. मात्र, पावसामुळे सामना थांबवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, 7 षटकांनंतर बांगलादेश संघाची धावसंख्या 66 धावा होती. दुसरीकडे, 7 षटकानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना 1 विकेट्स गमावत 42 धावांवर खेळत होता. पावसामुळे सामन्यात कायापालट झालाय. आता बांगलादेशला विजयासाठी 54 चेंडूत 85 धावांचे आव्हान मिळाले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी20 विश्वचषकाचा सम्राट बनला ‘किंग कोहली’! लाजवाब खेळीत रचला नवा विश्वविक्रम
पुन्हा एकदा विराटची ‘राजेशाही’ खेळी! टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 185 धावांचे आव्हान