इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये सर्वाधिक चर्चा कुणाची झाली असेल, तर ती म्हणजे वेगवान गोलंदाजी करणाऱ्या उमरान मलिक याची. मलिकने आयपीएल २०२२मधील सर्वात वेगवान चेंडू फेकला होता. त्यामुळे हा विक्रम त्याच्या नावावर झाला होता. मात्र, आता हा विक्रम आयपीएल २०२२च्या अंतिम सामन्यात मोडला गेला. रविवारी (दि. २९ मे) नरेंद्र मोदी स्टेडिअम, अहमदाबाद येथे पार पडला. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात पार पडला. या सामन्यात गुजरातचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसन याने हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकत मलिकचा विक्रम मोडला.
या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यादरम्यान गुजरातकडून पाचवे षटक टाकण्यासाठी लॉकी फर्ग्युसन (Lockie Ferguson) आला होता. यावेळी तो पहिल्या चेंडूपासूनच वेगात गोलंदाजी करत होता. मात्र, पाचव्या षटकातील शेवटचा चेंडू फर्ग्युसनने इतका जोरात टाकला की, त्याने थेट विक्रमच रचला.
I thought Umran Malik's record is going to stay but Lockie Ferguson has bettered him now with a 157.3 kph thunderbolt to Jos Buttler.#GTvRR | #IPLFinal pic.twitter.com/cNn8Q3xQze
— Prasenjiit Dey (@CricPrasen) May 29, 2022
फर्ग्युसनने टाकलेला हा चेंडू ताशी १५७.३ किमी इतक्या वेगाचा होता. यासह त्याने आयपीएल २०२२मधील ‘वेगाचा बादशाह’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमरान मलिक याचा वेगवान चेंडू फेकण्याचा विक्रम मोडला. उमरान मलिक याने या हंगामात तब्बल ताशी १५७ किमी वेगाने चेंडू फेकला होता.
मलिकनंतर या यादीत ताशी १५२.६ किमीच्या वेगाने गोलंदाजी करणारा एन्रीच नॉर्किया आहे. त्यानंतर चौथ्या स्थानी गुजरातचाच वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफ आहे. त्याने ताशी १५१.८ किमीच्या वेगाने चेंडू फेकला होता. यानंतर या हंगामात नव्याने सामील झालेला दुसरा संघ लखनऊ सुपर जायंट्सचा वेगवान गोलंदाज मोहसिन खान हा पाचव्या क्रमांकावर आहे. त्याने ताशी १५१ किमी वेगाने चेंडू फेकला होता.
आयपीएल २०२२मध्ये सर्वात वेगवान चेंडू फेकणारे गोलंदाज
ताशी १५७.३ किमी- लॉकी फर्ग्युसन (गुजरात टायटन्स)*
ताशी १५७ किमी- उमरान मलिक (सनरायझर्स हैदराबाद)
ताशी १५२.६ किमी- एन्रीच नॉर्किया (दिल्ली कॅपिटल्स)
ताशी १५१.८ किमी- अल्झारी जोसेफ (गुजरात टायटन्स)
ताशी १५१ किमी- मोहसिन खान (लखनऊ सुपर जायंट्स)
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तानी क्रिकेटरच्या फक्त राजस्थानला शुभेच्छा, दिला खास संदेश