इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात उद्यापासून(14 नोव्हेंबर) 2 सामन्यांची कसोटी मालिका(Test Series) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना(1st Test) 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. तर दुसरा सामना 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान कोलकाताला होणार आहे.
विशेष म्हणजे दुसरा सामना दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. हा भारताचा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने दिवस-रात्र कसोटीसाठी इंदोरमध्ये मंगळवारी गुलाबी चेंडूने सराव केला आहे.
यादरम्यानचा एका व्यक्तीने गुलाबी चेंडूंचा बॉक्स उघडतानाचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
तसेच या व्हिडिओला बीसीसीआयने कॅप्शन दिले आहे की ‘पहा कोण इथे आले आहे- गुलाबी चेंडूचा बॉक्स उघडत आहे. आज भारतीय संघाने नेटमध्ये गुलाबी चेंडूने सराव केला आहे.’
https://twitter.com/BCCI/status/1194237138981642242
मात्र या व्हिडिओमधील व्यक्ती कोण आहे, याबद्दल बीसीसीआयने कोणतीही कल्पना दिलेली नाही. पण या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीने हातात केमोफ्लाज लेदर घड्याळ घातले आहे. तसेच त्याच्या शरिरयष्टीवरुन तो भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीसारखा वाटत असल्याने अनेक चाहत्यांनी तो धोनीच असल्याचे म्हटले आहे.
Dhoni 🤔
— shaswat (@imthe_shaswat) November 12, 2019
He is #THALA 7.
— Pranav (@kumarpranav0123) November 12, 2019
Height* match
Watch* match
Hairs* probablySo basically it's msd. Or is it only me
— Upside_down_Diver (@DiverUpside) November 12, 2019
I think so and the watch in his hand it seems like MSD
— MyouiSwift (@AccSwifties) November 12, 2019
@msdhoni 👍👍👍
— Ankur Sharma (@AnkurSh75287525) November 12, 2019
https://twitter.com/ajeetsunilajeet/status/1194244059390529540
Its @msdhoni Look at the watch strap
— Yᴀꜱʜ (@yshgupta_) November 12, 2019
धोनी मागील अनेक महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याने भारताकडून शेवटचा सामना 2019 विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध खेळला आहे. त्यानंतर त्याने क्रिकेटमधून विश्रांती घेतली आहे.
रोहित शर्माला ४ दिवसांपूर्वी अपूर्ण राहिलेला 'तो' विक्रम उद्या पूर्ण करण्याची सुवर्णसंधी
वाचा👉https://t.co/SkfjOHfBtS👈#म #मराठी @Mazi_Marathi @BeyondMarathi #RohitSharma #INDvBAN— Maha Sports (@Maha_Sports) November 13, 2019
…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!
वाचा👉https://t.co/tAl9l6wh2r👈#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #RohitSharma— Maha Sports (@Maha_Sports) November 13, 2019