fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

रोहित शर्माला ४ दिवसांपूर्वी अपूर्ण राहिलेला ‘तो’ विक्रम उद्या पूर्ण करण्याची सुवर्णसंधी

इंदोर। भारत विरुद्ध बांगलादेश(India vs Bangladesh) संघात उद्यापासून(14 नोव्हेंबर) 2 सामन्यांची कसोटी मालिका(Test Series) सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना(1st Test) 14 ते 18 नोव्हेंबर दरम्यान होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला(Rohit Sharma) एक खास विक्रम करण्याची संधी आहे.

रोहितने या सामन्यात जर 2 किंवा त्यापेक्षा अधिक षटकार मारले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकार पूर्ण करेल. 400 षटकारांचा टप्पा पार करणारा तो जगातील केवळ तिसराच क्रिकेटपटू ठरेल. आत्तापर्यंत केवळ वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल आणि पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने अशी कामगिरी केली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार(Most Sixes in International Cricket) मारण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. त्याने 462 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 534 षटकार ठोकले आहेत. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करणारा तो सध्यातरी एकमेव क्रिकेटपटू आहे.

त्याच्यापाठोपाठ सर्वाधिक षटकार मारण्याच्या यादीत आफ्रिदी आहे. त्याने 524 सामन्यात 476 षटकार ठोकले आहेत.

त्यानंतर सध्या या यादीत रोहित 349 सामन्यात 398 षटकारांसह न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम बरोबर संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅक्युलमने 432 सामन्यात 398 षटकार मारले आहेत.

रोहितने कसोटीमध्ये 51 षटकार ठोकले आहेत तर टी- 20 मध्ये रोहितच्या नावावर 115 षटकार आहेत आणि वनडेमध्ये त्याने 232 षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंच्या यादीत रोहित पाठोपाठ एमएस धोनी आहे. धोनीने 538 सामन्यात 359 षटकार ठोकले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू –

534 – ख्रिस गेल

476 – शाहिद आफ्रिदी

398 – रोहित शर्मा

398 – ब्रेंडन मॅक्यूलम

359 – एमएस धोनी

You might also like