लंडन। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्स क्रिकेट मैदानात सुरु आहे. शनिवारी (१४ ऑगस्ट) या सामन्याचा तिसरा दिवस होता. मात्र, या दिवशी इंग्लिंग चाहत्यांकडून लज्जास्पद वर्तन झाल्याचे पाहायला मिळाले. यामुळे सध्या बरीच चर्चा होत आहे.
झाले असे की तिसऱ्या तिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत होता. यावेळी भारताचा केएल राहुल थर्ड मॅन बाऊंड्री लाईनजवळ क्षेत्ररक्षण करत होता. त्यावेळी डावाचे ६९ व्या षटक सुरु असताना प्रेक्षकांमधून काही जणांनी शॅम्पेन कॉर्क (बॉटलची झाकणे) केएल राहुलच्या दिशेने फेकून मारली.
याबद्दल केएल राहुलने भारताचा कर्णधार विराट कोहलीकडे तक्रार केली. स्लीपला क्षेत्ररक्षण करत असलेल्या विराटने याबद्दल निराषा व्यक्त केली. तसेच केएल राहुलला इशाऱ्याने सांगितले की ते कॉर्क पुन्हा प्रेक्षकांमध्ये फेक. केएल राहुलनेही कर्णधाराचा सल्ला ऐकत कॉर्क प्रेक्षकांमध्ये फेकले.
कॉर्कमुळे जरी काही नुकसान झाले नसले, तरी प्रेक्षकांवर सध्या टिका होत आहे. असे असले तरी अद्याप विराटने याबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही.
Champagne cork !!
Cheap from England fans #ENGvIND pic.twitter.com/5Jd6HZEu9C
— HITMAN (@MGR_VJ) August 14, 2021
https://twitter.com/Pranjal_King_18/status/1426512975167328259
Jis batsman ne 100 mara ho use champagne Cork marke pareshan krna is NOT FUNNY.#shame_on_Eng#KLRahul@ICC @BCCI #English #ENGvIND pic.twitter.com/PnDc8zMssd
— Nitin Yadav (@YNitin007) August 14, 2021
https://twitter.com/AdhiIsHere/status/1426513661577687042
https://twitter.com/BrokenBanker/status/1426508171934375939
केएल राहुलचे शतक
या सामन्यात पहिल्या डावात भारताकडून सलामीला फलंदाजी करताना केएल राहुलने शतकी खेळी केली. त्याने २५० चेंडूच १२ चौकार आणि १ षटकारासह १२९ धावांची खेळी केली. याबरोबरच त्याने सलामीला रोहित शर्मासह १२६ धावांची भागीदारी केली. रोहितने ८३ धावा केल्या. तर विराटने ४२ आणि रविंद्र जडेजाने ४० धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने पहिल्या डावात सर्वबाद ३६४ धावा केल्या.
इंग्लंडकडून जो रुटचे शतक
भारताचा डाव संपल्यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीला उतरला. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. मात्र, नंतर जो रुटने इंग्लंडचा डाव सावरताना शतकी खेळी केली. तर जॉनी बेअरस्टोने अर्धशतक केले. रुटने डावाच्या ८२ व्या षटकात त्याचे २२ वे कसोटी शतक पूर्ण केले. तर बेअरस्टो ५७ धावा करुन बाद झाला. या दोघांच्या खेळीमुळे इंग्लंडने तिसऱ्या दिवशी ९६ षटकांपर्यंत ३०० धावांचा टप्पा पार केला.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून इशान किशनला रोहित शर्मा म्हणाला, ‘कोणी काही बोलले तर त्याला माझ्याशी बोलायला सांग’
स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना अकमलची इंग्रजी पाहून तुम्हीही खदखदून हसाल; चाहते म्हणाले…