2015 पासून परदेशात टीम इंडियाची (Team india) चांगली कामगिरी सुरू झाली होती. पुढच्या 9 वर्षांत भारतीय कसोटी संघाने विशेष करून गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे परदेशात मोठे पराक्रम गाजवले. पण इंग्लंडविरुद्ध चालू असलेल्या मालिकेत युवा कर्णधार शुबमन गिलच्या (Shubman gill) नेतृत्वात भारतीय संघ खूपच निराशाजनक कामगिरी करत आहे. विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या वारशाला गिलच्या टीमने जणू संपवलेच आहे.
2016 ते 2024 या काळात भारतासाठी विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्माने कसोटी संघाचं नेतृत्व केलं. या तिघांच्या कर्णधारपदात भारताने कधीच ‘सेना’ देशांत (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) प्रतिस्पर्ध्यांना 500 पेक्षा जास्त धावा करू दिल्या नव्हत्या. पण 2025 मध्ये इंग्लंडविरुद्ध ही परंपरा खंडित झाली. मँचेस्टर कसोटीच्या पहिल्या डावात इंग्लंडने 8 खेळाडूंच्या मोबदल्यात 669 धावा केल्या आहेत. गिलच्या नेतृत्वात भारताची स्थिती अत्यंत चिंताजनक वाटत आहे.
मालिकेत भारतीय फलंदाजांनी काही प्रमाणात धावा केल्या असल्या, तरी गोलंदाज मात्र पूर्णपणे निष्प्रभ ठरले. भारताने पहिल्या डावात 358 धावा केल्या होत्या, पण इंग्लंडने त्यावर 668 धावा करत चांगली आघाडी घेतली आहे. सध्या मालिका 2-1 ने इंग्लंडच्या बाजूने आहे आणि मँचेस्टर कसोटीतही इंग्लंडने वर्चस्व मिळवलं आहे. या परिस्थितीतून भारतासाठी सामना जिंकणं जवळपास अशक्यच झालं आहे.






