आगामी आशिया चषक स्पर्धेसाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. रोहित शर्माच्या नेतृत्वातील 17 सदस्यीय संघ श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत आपले आव्हान सादर करेल. सोमवारी (21 ऑगस्ट) संघाची घोषणा ज्यावेळी झाली त्यावेळी मोठा संभ्रम पाहायला मिळाला. सोशल मीडियावर आठ मिनिटांमध्ये मोठी चर्चा रंगली.
सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास स्टार स्पोर्ट्स या वाहिनीवरून भारतीय संघाची घोषणा केली गेली. त्यावेळी सुरुवातीला सोळा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला. प्रेझेंटर जतीन सप्रू याने ज्यावेळी खेळाडूंची नावे घोषित केली त्यावेळी त्यामध्ये शुबमन गिल याचे नाव त्यामध्ये समाविष्ट नव्हते. त्याच्यासोबत चर्चा करत असलेले समीक्षक संजय बांगर व सुनील जोशी यांनी देखील हा गिल याच्यावर अन्याय असल्याचे म्हटले. जवळपास आठ मिनिटे या गोष्टीवर चर्चा झाली.
मात्र, त्यानंतर नव्याने संघातील खेळाडूंची नावे जाहीर केली गेली. 17 जणांच्या या संघात यावेळी त्याचा समावेश केला गेला होता. सोशल मीडियावर मात्र मोठ्या प्रमाणात गिल याच्या बाजूने लोक बोलताना दिसत होते. अखेर स्टार स्पोर्ट्सने माफी मागत आपली ही चूक झाल्याचे म्हटले.
गिल हा 2021 या वर्षात शानदार फॉर्ममध्ये दिसून आला आहे. त्याने वर्षाच्या सुरुवातीलाच वनडेत द्विशतक झळकावले होते. तसेच टी20 मध्ये देखील त्याच्या बॅटमधून शतक आलेले. त्यानंतर झालेल्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत तो ऑरेंज कॅप पटकावण्यात यशस्वी ठरलेला. त्यानंतर मात्र जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा व वेस्टइंडीज दौऱ्यावर फारशी उत्कृष्ट कामगिरी त्याला करता आली नाही.
(Lots Of Confusion When Asia Cup India Sqaud Announced On Shubman Gill)
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात सुरवातीच्या सामन्यांना मुकणार केएल राहुल, आगरकरांनी दिली ‘मोठी’ माहिती
शिखर धवनची भविष्यवाणी! विश्वचषकात ‘हे’ पाच खेळाडू करणार धमाका, यादीत दोन भारतीय