---Advertisement---

चक्क ३०० किमीचा प्रवास करत विहारीने मध्यरात्री वाजवला तिचा दरवाजा, वाचा त्याची ‘प्यार वाली लव्हस्टोरी’

On: रविवार, जून 6, 2021 11:02 AM
---Advertisement---

विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमने सामने असणार आहेत. तसेच हा सामना झाल्यानंतर भारतीय संघाला इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळायची आहे. या दौऱ्यावर हनुमा विहारीला देखील संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु मैदानावर दिसायला शांत आणि लाजाळू स्वभावाचा असणारा विहारी प्रेमाच्या बाबतीत तितकाच निर्भिडपणे व्यक्त होणारा व्यक्ती आहे. त्याने पत्नीला प्रपोज केल्याचा प्रसंग न विसरण्याजोगा होता.

विहारीच्या आयुष्यातील एक किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे. विहारी आणि त्याची पत्नी प्रिती हे दोघेही १९ मे २०१९ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. परंतु प्रितीचे प्रेम मिळवण्यासाठी विहारीने काय केले असावे? याचा तुम्ही विचारही करू शकत नाही.

विहारी आपल्या पत्नीवर किती प्रेम करतो याचा अंदाज तुम्ही या गोष्टीवरून घेऊ शकता. प्रितीला भेटण्यासाठी हा क्रिकेटपटू चक्क रात्री २ वाजता ३०० किलोमीटर गाडी चालवत तिच्या घरी पोहोचला होता. विहारी आणि त्याच्या मित्रांनी हा किस्सा क्रिकबजच्या एका शोमध्ये सांगितला होता.

एका मित्राने सांगितले की, “विवाह होण्यापूर्वी प्रिती हैदराबादपासून खूप लांब वारंगलमध्ये राहत होती. जे कमीत कमी ३०० किलोमीटर दूर होते. हा तिला भेटण्यासाठी गाडी चालवत गेला होता. जेव्हा त्याने मला ही गोष्ट सांगितली तेव्हा रात्रीचे दिड-दोन वाजले होते. माझ्या एका हातात बिर्याणी होती आणि दुसऱ्या हातात सांबर व भाताची प्लेट होती. मी येण्यास नकार दिला. परंतु त्याने मला म्हटले की, मला जायचं आहे. तेव्हा मी त्या प्लेटसोबत घेऊन गेले होतो आणि गाडी हा (विहारी) चालवत होता.”

त्यानंतर विहारीने सांगितले की, “आम्ही तिथे गेलो तेव्हा गेट बंद होते. मी तिला नंतर फोन कॉल केला होता. परंतु तिने खाली येण्यास नकार दिला होता. त्यामुळे मी निराश झालो होतो.”

इतक्यात त्याच्या मित्राने म्हटले होते की, “मग याने भिंतीवर चढून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता.” परंतु विहारिने हसत म्हटले होते की, “हे खरं नाहीये.” परंतु त्याच्या मित्राने हे खरं असल्याचे सांगितले होते.

अशी झाली होती सुरुवात
प्रिती आणि विहारी यांची मुलाखत एक सामान्य मित्र म्हणून झाली होती. सुरुवातीला हे एकमेकांसोबत खूप कमी बोलायचे. परंतु त्यानंतर ते एकमेकांशी जास्त बोलायला लागले होते. दोघांनी सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर विहारीने तिला कँडेल लाईट डिनरमध्ये प्रपोज केला होता. घरातील सदस्यांची समजूत घातल्यानंतर या दोघांनी विवाह केला होता. विहारी क्रिकेटविश्वात यशाच्या शिखरावर आहे तर, प्रिती फॅशन डिझायनर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हा विश्वासचं म्हणायचा की! ‘युवा भारतीय संघ श्रीलंकेत मालिका जिंकल्यास आश्चर्य वाटणार नाही’

WTC स्पर्धेत ‘हे’ २ महत्वाचे बदल करण्याची गरज; भारतीय दिग्गजाची ‘व्हेरी व्हेरी स्पेशल’ मागणी

अनुभवी यष्टीरक्षकाचे बडेबोल; कारण सांगत म्हणाला, ‘जगभरातील संघ रिषभच्या नावालाही घाबरत आहेत’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---