शनिवारी (दि. 08 जुलै) भारतीय संघाचा माजी दिग्गज कर्णधार आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली 51वा वाढदिवस साजरा करत आहे. क्रिकेट खेळत असताना फलंदाज आणि कर्णधार म्हणून गांगुलीने नेहमीच सर्वोत्तम कामगिरी केली. यादरम्यान त्याने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटप्रमाणे गांगुलीची लव्हस्टोरीमध्येही चढ-उतार आले. मात्र, ‘दादा’ने त्याच्या प्रेमासाठी सर्व हद्द पार केली. कदाचित अनेक क्रिकेटप्रेमींना माहिती नसेल की, सौरव गांगुली आणि पत्नी डोना यांनी दोन वेळा लग्न केले आहे.
शेजारीण मुलीच्या प्रेमात ‘दादा’ क्लीन बोल्ड
खरं तर, सौरव गांगुली आणि डोना (Sourav Ganguly And Dona) यांच्यातील प्रेमाला लहानपणीच सुरुवात झाली होती. डोना ही गांगुलीच्या घराच्या शेजारी राहायची. तसेच, दोघेही नेहमी एकमेकांना भेटायचे. गांगुली आणि डोना यांची शाळा वेगळी होती. अशात, आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी ‘दादा’ (Dada) लपून-छपून जायचा. मात्र, गांगुली आणि डोनाच्या कुटुंबाचे एकमेकांशी जास्त पटत नसायचे.
https://www.instagram.com/p/ClHjWACMVOZ/?hl=en
गांगुलीने केला प्रपोज
सन 1996मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी गांगुलीने डोनाला प्रपोज केला. दोघांनाही कायमचे एकमेकांसोबत राहायचे होते, पण दोघांच्या कुटुंबाला हे मान्य नव्हते. त्याचमुळे गांगुली आणि डोना यांना लपून-छपून एकमेकांना भेटावे लागायचे.
गांगुली आणि डोनाचे कोर्ट मॅरेज
गांगुलीचा इंग्लंड दौरा खूपच शानदार राहिला होता. इंग्लंडहून परतताच गांगुलीने डोनासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. गांगुली आणि डोना यांनी एका मित्राच्या मदतीने कोर्ट मॅरेज करण्यासाठी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पोहोचले. मात्र, माध्यमांमध्ये ही बातमी पसरली आणि दोघांना लग्न न करताच तिथून धूम ठोकावी लागली. यानंतर 12 ऑगस्ट, 1996 रोजी गांगुली आणि डोना यांनी गुपचूप कोर्ट मॅरेज केले. मात्र, दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळू दिले नाही.
पुन्हा थाटला संसार
गांगुली आणि डोना यांच्या कोर्ट मॅरेजला एक वर्षही लोटले नव्हते की, दोघांच्या कोर्ट मॅरेजबाबत कुटुंबीयांना समजले. त्यानंतर दोन्ही कुटुंबांनी त्यांचा विरोध केला. मात्र, शेवटी त्यांना या दोघांच्या प्रेमापुढे हार मानावी लागली. 21 फेब्रुवारी, 1997 रोजी गांगुली आणि डोना यांनी पूर्ण रीतीरिवाजांनुसार पुन्हा संसार थाटला. या जोडप्याला सना नावाची 21 वर्षांची मुलगी आहे.
https://www.instagram.com/p/Ckm9ubmPxTd/?hl=en
‘दादा’ची कारकीर्द
सौरव गांगुली याच्या कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने भारतीय संघाकडून आतापर्यंत 113 कसोटी सामने आणि 311 वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत दादाने 42.18च्या सरासरीने 7212 धावा केल्या आहेत. यामध्ये 16 शतके, 1 द्विशतक आणि 35 अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच, वनडेत दादाने 40.73च्या सरासरीने 11363 धावा केल्या आहेत. यामध्ये 22 शतके आणि 72 अर्धशतकांचा समावेश आहे. (love story of sourav ganguly and wife dona couple had to marry twice)
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकापूर्वी OYO कंपनीने उचलले मोठे पाऊल, 10 शहरांमध्ये वाढवणार तब्बल ‘एवढे’ हॉटेल्स
अखेर टीम इंडियाच्या ‘त्या’ मालिकेला मिळाला मुहूर्त! जय शहांनीच सांगितली तारीख